AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का? भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या

महाराष्ट्रासह देशातील 20 राज्यांमध्ये मागील 15 वर्षे म्हणजेच दीड दशकापासून सामाजिकदृष्ट्या संवेदनशील युवकांच्या जडणघडणीसाठी काम करणाऱ्या "निर्माण" संस्थेने भारतातील पहिली अनोखी प्रश्नावली तयार केलीय.

तरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का? भारतातील 'या' पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या
| Updated on: Jun 20, 2021 | 5:58 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील 20 राज्यांमध्ये मागील 15 वर्षे म्हणजेच दीड दशकापासून सामाजिकदृष्ट्या संवेदनशील युवकांच्या जडणघडणीसाठी काम करणाऱ्या “निर्माण” संस्थेने भारतातील पहिली अनोखी प्रश्नावली तयार केलीय. यात निवडक 50 प्रश्नांची निवड करुन त्याद्वारे तरुणांना आपल्या एकूण विकास आणि भविष्याबद्दल स्पष्टता येण्यासाठी मदत करण्यात आलीय. या प्रश्नावलीचं नाव ‘युथ फ्लरीशिंग प्रश्नावली’ (Nirman Youth Flourishing Questionnaire) असं आहे. अवघ्या काही मिनिटात या प्रश्नांची उत्तरं देत प्रत्येक तरुणाला आपण युवक म्हणून विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत आणि आणखी कोणत्या घटकांवर लक्ष देणं आवश्यक आहे याची माहिती मिळणार आहे (Know all about what is Nirman Youth Flourishing Questionnaire and importance).

या उपक्रमाविषयी माहिती देताना निर्माणने संचालक अमृत बंग म्हणाले, “भारताच्या लोकसंख्येतील युवांचे प्रमाण तब्बल 22 टक्के आहे. याचाच अर्थ, भारतात 26 कोटींपेक्षाही जास्त युवा आहेत. हीच युवाशक्ती म्हणजे भारताचे भविष्य आहे आणि म्हणूनच देशातील युवांच्या विकासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते. गडचिरोलीतील सर्च या सामाजिक संस्थेचा ‘निर्माण’ हा उपक्रम पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली 2006 पासून युवांच्या विकासासाठी काम करीत आहे. 18 जून 2021 रोजी निर्माण आपला दीड दशकाचा प्रवास पूर्ण केला. या प्रवासादरम्यान निर्माणने भारताच्या 20 राज्यांतील विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या हजारो युवांसोबत काम केलं आहे व त्यांच्या विकासासाठी मार्गदर्शन केले आहे.”

संवेदनशील युवा ‘निर्माणा’च्या दीडदशकातील अनुभवातून प्रश्नावली

“युवांचा विकास हा केवळ परीक्षेतील गुण, पदवी, पॅकेज, गाडी वा संपत्ती यांवरून न ठरता ‘फ्लरीशिंग’च्या व्यापक संकल्पनांवर आधारित असायला पाहिजे, अशी निर्माणची धारणा आहे. या घडीला, भारतीय युवांसंदर्भात फ्लरीशिंगच्या, म्हणजेच ते विकासाच्या इष्टतम स्थितीत आहेत का, याबद्दल कोणतीही ठोस माहिती वा आकडेवारी उपलब्ध नाही. पाश्चात्य देशांतील संशोधनांप्रमाणे साधारणत: केवळ 20 टक्के युवांमध्ये ‘फ्लरीशिंग’ची चिन्हे दिसून येतात,” अशी माहिती अमृत बंग यांनी दिली.

“प्रश्नावलीत युवांना विविधांगाने बहरण्यासाठी विविध संधी व पर्याय”

आपल्या देशाच्या लोकसंख्येतील युवा गटाचा मोठा वाटा आहे. ते लक्षात घेऊन भारतीय युवांमध्ये फ्लरीशिंगची स्थिती काय हे कळणे आणि युवांना विविधांगाने बहरण्यासाठी विविध संधी व पर्याय उपलब्ध करून देणे नितांत गरजेचे आहे. हाच विचार करुन निर्माणने ही प्रश्नावली तयार केलीय.

“फ्लरीशिंगवर दृष्टीक्षेप टाकणारी भारतातील पहिलीच प्रश्नावली”

युवांना त्यांच्या सध्याच्या ‘फ्लरीशिंग’ स्थितीबाबतचा निष्कर्ष स्वत:च काढता यावा म्हणून गेल्या 15 वर्षांच्या युवांसोबतच्या कामाच्या अनुभवांतून, निरीक्षणातून व वैज्ञानिक अभ्यासातून निर्माणने ‘युवा फ्लारीशिंग प्रश्नावली’ तयार केली आहे.

ही प्रश्नावली कोठे उपलब्ध?

फ्लरीशिंगवर दृष्टीक्षेप टाकणारी अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच प्रश्नावली आहे. ही प्रश्नावली निर्माणच्या वेबसाईटवर पूर्णत: ऑनलाईन उपलब्ध आहे. निर्माण वेबसाईट – www.nirman.mkcl.org निर्माण युवा फ्लरीशिंग प्रश्नावली – https://forms.gle/KH9mo1xhVzUuLBUC9

प्रश्नावलीची वैशिष्ट्ये

ही प्रश्नावली फ्लरीशिंगसंदर्भातील 7 मुख्य विभागांत वर्गीकरण केलेल्या 50 महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश टाकते. प्रश्नावली भरणाऱ्या व्यक्तीला तिच्या इमेलवर तपशीलवार अहवाल मिळतो. याचा वापर करून स्वत:च्या बहुआयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट्य काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार करून याबाबतीत युवा स्वयंपूर्ण बनू शकतात. ही प्रश्नावली युवांना स्वतःचे मूल्यमापन करून फ्लरीशिंगचा पुढील मार्ग ठरवण्यास उपयुक्त ठरेल आणि म्हणून जास्तीत जास्त युवांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन निर्माण या संस्थेने केलंय. फ्लरीशिंग युवा हेच फ्लरीशिंग भारताचे द्योतक असतील, असंही संस्थेनं म्हटलंय.

हेही वाचा :

कोरोना विरुद्धच्या युध्दात युवकांची भूमिका काय? : डॉ.अभय बंग

BLOG: International Youth Day | जगातील सर्वात तरुण देश आणि त्याच्या समोरील आव्हानं

BLOG: भारतात पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त युवा, त्यांचा विकास कसा होणार?

व्हिडीओ पाहा :

Know all about what is Nirman Youth Flourishing Questionnaire and importance

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.