SSC exam: दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या, हायकोर्टात राज्य सरकारचं प्रतित्रापत्र, आज सुनावणीची शक्यता

महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षा दहावीपेक्षा महत्वाच्या असल्याचं हायकोर्टात सांगितलं आहे. Maharashtra Government HSC SSC

SSC exam: दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या, हायकोर्टात राज्य सरकारचं प्रतित्रापत्र, आज सुनावणीची शक्यता
दहावी बारावी बोर्ड

मुंबई:केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासा पुणे येथील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं. राज्य सरकारचा दहावी परीक्षेबाबतचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं होते. शिक्षण विभागानं हायकोर्टात प्रतित्रापत्र सादर करुन दहावीचा निकाल जाहीर करण्यासंबधी निकष आणि सरकारची बाजू कोर्टात मांडली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये फरक असतो. दहावी पेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या असतात, अशी बाजू सरकारनं मांडली आहे. (Maharashtra Government said HSC exams are important than SSC in Bombay High Court)

दहावीच्या परीक्षा घेणं शक्य नाही

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. तसंच आपली बाजू मांडण्याचे आदेशही शिक्षण विभागाला दिले होते. त्याबाबत राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. 10 वी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

दहावीचा निकाल कसा लावणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2021 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे.
शैक्षविक वर्ष 2020-21 साठी 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण
ii. विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण
iii. विद्यार्थ्यांचा 9 वी चा अंतिम निकाल 50गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

शासनाकडून जीआर जारी

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दहावी एसएससी परीक्षेसदंर्भात शासन निर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होतं. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी 24 बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : दहावीचा निकाल जूनमध्ये, नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन मूल्यांकन, 11 प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

(Maharashtra Government said HSC exams are important than SSC in Bombay High Court)