maharashtra ssc hsc exam result 2021: दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

दुपारी एक वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल, तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

maharashtra ssc hsc exam result 2021: दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा?
दहावी बारावी पुरवणी परीक्षा निकाल
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 1:09 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी तसेच बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल, तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

पुरवणी परीक्षेचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक 22 सप्टेंबर 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते 12ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.

दहावी बारावीचा निकाल कुठे पाहणार?

www.mahresult.nic.in

निकाल कसा पाहाल ?

?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

गुणांची गुणपडताळणी ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुविधा उपलब्ध

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ते शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ते मंगळवार 9 नोव्हेंबर 2-21 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

संबंधित बातम्या:

SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी 1 वाजता निकाल

MSEDCL Electricity Assistant Result: महावितरणकडून विद्युत सहायक भरतीचा निकाल जाहीर, 4534 उमेदवारांची निवड

maharashtra ssc hsc board supplementary exam 2021 result declare today how to check result on www mahresult nic in

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.