Medical College : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा ! ‘अशी’ आहे नवीन इमारत, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्या लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय हे विलेपार्ले (पश्चिम) मधील गुलमोहर मार्गावर जेव्हीपीडी स्कीम येथे स्थित आहे. यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे.

Medical College : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा ! 'अशी' आहे नवीन इमारत, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्या लोकार्पण
काका मला वाचवा हिंदुत्वाची भूमिका घेऊ नका, म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार, दरेकरांचा सेनेला टोलाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 3:59 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हिंदुहृदयसम्राट ( Hindu Hriday Samrat) बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत विलेपार्ले (पश्चिम) मधील कूपर रुग्णालय (Cooper Hospital) परिसरात बांधण्यात आलीये. या नवीन इमारतीचे लोकार्पण उद्या, 25 एप्रिल 2022 रोजी राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 3वाजता होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय हे विलेपार्ले (पश्चिम) मधील गुलमोहर मार्गावर जेव्हीपीडी स्कीम येथे स्थित आहे. यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ही नवीन इमारत मुख्यत्त्वाने एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसीन ऍण्ड बॅचलर ऑफ सर्जरी) पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरीता उपयोगात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीविषयी माहिती

तळघर, तळमजला आणि त्यावर 5 मजले अशा स्वरुपाची या इमारतीची संरचना आहे. सुमारे 36 हजार 397 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये तळमजला ते चौथ्या मजल्यापर्यंतचा वापर वैद्यकीय महाविद्यालयीन सेवांकरिता होणार आहे. पाचव्या मजल्यावर सर्व विभागप्रमुखांची कार्यालये असतील. यामध्ये तेरा विभागांची व्यवस्था राहणार आहे.

इमारतीतील मजलानिहाय तपशील लक्षात घेता पुढीलप्रमाणे रचना ठरविण्यात आली आहे.

1) तळघर: वाहनतळ (59 चारचाकी वाहने आणि 49 लहान वाहन क्षमता), वातानुकूलन यंत्रणा कक्ष, उदंचन कक्ष, विद्युत संरचना कक्ष, आठ उद् वाहनांसाठी चार खोल्या.

2) तळमजला: अधिष्ठाता कार्यालय, प्रशासन, अभ्यागत कक्ष, शरीररचना विभाग, आच्छादित अंगण, प्रात्यक्षिक कक्ष, संशोधन प्रयोगशाळा, मध्यवर्ती ग्रंथालय, स्वयंपाकगृह, भोजनगृह.

3) पहिला मजलाः फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सेंट्रल लायब्ररी, लायब्ररी (जर्नल सेक्शन), सेंट्रल लायब्ररी, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, म्युझियम, प्रॅक्टिकल लॅब, स्टाफ फॅसिलिटी रूम, महिला विद्यार्थी कॉमन रूम, पुरुष विद्यार्थी कॉमन रूम.

4) दुसरा मजलाः फिजिओलॉजी, कम्युनिटी मेडिसीन, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, 240 आसन क्षमतेच्या दोन वर्गखोल्या, 300 आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, 565 चौरस मीटरचे ग्रंथालय, संग्रहालय, प्रॅक्टिकल लॅब, ऑडिओ व्हिज्युअल रूम्स, एअर हँडलिंग युनिट.

5) तिसरा मजलाः पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, 240 आसन क्षमतेच्या दोन वर्गखोल्या, संग्रहालय, प्रॅक्टिकल लॅब, एअर हँडलिंग युनिट.

6) चौथा मजला: न्यायवैद्यक औषध विभाग, तीन डेमो रूम्स, रिसर्च लॅब, 500 आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, संग्रहालये, विभागासाठी प्रॅक्टिकल लॅब, तीन परीक्षा सभागृह, पी.जी. विद्यार्थ्यांसाठी कॉमन लॅब.

7) पाचवा मजला: सर्व 13 विभागप्रमुखांची कार्यालये. यामध्ये ऑफिस ऑफ मेडिसिन, त्वचाविज्ञान, वेनेरोलॉजी आणि कुष्ठरोग, क्षयरोग आणि श्वसन रोग, ऑटोरिनॉलॅरिन्गोलॉजी, शस्त्रक्रिया, मानसोपचार, बालरोग, ऑर्थोपेडिक्स, रेडिओ-निदान, रेडिओ-थेरपी, दंतचिकित्सा, प्रसूती आणि गायनेकोलॉजी यांचा समावेश.

उद्या 25 एप्रिल 2022 रोजी या वैद्यकीय महाविद्यालयाचा लोकार्पण राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता होणार आहे. या समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इतर बातम्या :

Nilesh Rane : रस्त्यावर सुरू केलेली लढाई आम्हीही रस्त्यावर संपवू, निलेश राणे यांचा आघाडीला इशारा

Pune Narayan Rane : उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? नारायण राणेंचा प्रहार; राष्ट्रपती राजवटीबाबतही व्यक्त केलं मत, म्हणाले…

आता, सहज बंद करता येईल आपले credit cards; 1 जुलैपासून लागू होणार नवे नियम लागू…

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.