आता, सहज बंद करता येईल आपले credit cards; 1 जुलैपासून लागू होणार नवे नियम लागू…

भारतीय ग्राहक आता आपले क्रेडिट कार्ड सहज बंद करू शकणार आहेत, आरबीआयचा हा नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे तसे न केल्यास कार्ड जारी करणार्‍या बँकेवर प्रतिदिन 500 रुपये दंड आकारला जाईल. क्रेडिट कार्ड बंद होईपर्यंत हा दंड लागू राहील.

आता, सहज बंद करता येईल आपले credit cards; 1 जुलैपासून लागू होणार नवे नियम लागू...
credit cardImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 3:24 PM

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (RBI) ने ‘क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स’बाबत (About credit and debit cards) काही नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम ग्राहकांना नवीन कार्ड देण्याबाबत आहेत. सध्याच्या नियमांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने ‘क्रेडिट कार्ड’ बंद करण्याबाबत काही नवीन नियमही केले असून, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा क्रेडिट कार्ड बंद करण्याचे अधिकाधिक सोयीस्कर पर्याय (Convenient option) मिळत आहेत. जर ग्राहकाने बँकेला क्रेडिट कार्ड बंद किंवा रद्द करण्यास सांगितले तर त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. बँका कार्ड बंद करून ईमेल, एसएमएसद्वारे माहिती देतील. आरबीआयचा हा नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार असून, तसे न केल्यास ‘क्रेडिट कार्ड’ बंद होईपर्यंत, कार्ड जारी करणार्‍या बँकेवर प्रतिदिन 500 रुपये दंड (Bank fined Rs 500 per day) आकारला जाईल.

काय आहे नवी नियमावली

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रीपोर्टनुसार, आरबीआयने आपल्या नवीन नियमात सांगितले आहे की, क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय दिले जातील. जसे की बँकेचा हेल्पलाइन क्रमांक, सादर कोलेला ईमेल आयडी, आयव्हीआर, वेबसाइटवरील त्याची लिंक, इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप इत्यादी. या सर्व माध्यमातून क्रेडिट कार्ड बंद केले जाऊ शकते. ग्राहकाने क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती केल्यानंतर बँकेला 7 दिवसांच्या आत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. तसे न केल्यास कार्ड जारी करणार्‍या बँकेवर प्रतिदिन 500 रुपये दंड आकारला जाईल. क्रेडिट कार्ड बंद होईपर्यंत हा दंड लागू राहील. तथापि, ज्या ग्राहकाने आपले क्रेडिट कार्ड बंद करण्यास सांगितले आहे त्याच्या खात्यावर कोणतीही थकबाकी नसावी.

वर्षभर वापर नसलेले कार्ड होतील बंद

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, बँका ग्राहकाला क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी पोस्टद्वारे बंद करण्याची विनंती पाठविण्यास सांगू शकत नाहीत. असे म्हटल्यास विनंतीला विलंब झाल्याचे कारण मानले जाईल आणि बँकेला दंड आकारला जाईल. हा नियम बँकांप्रमाणेच NBFC साठीही लागू आहे. ग्राहकाने कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा अगदी IVR द्वारे कार्ड बंद करण्याची विनंती केल्यास बँकांना कार्ड बंद करण्याची विनंती 7 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागेल. एखादे क्रेडिट कार्ड वर्षभर वापरत नसल्यास बँका स्वत:हून असे कार्ड बंद करू शकतात, तर बँक ग्राहकांना ईमेल, संदेशाद्वारे याची माहिती देईल आणि ते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करेल. कार्डधारकाने 30 दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, बँक आपोआप क्रेडिट कार्ड रद्द करेल. यानंतर, कार्ड रद्द झाल्याची संपूर्ण माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीला दिली जाईल. खातेदाराच्या क्रेडिट कार्डमध्ये काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती त्याच बँकेच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.

Bhandara | शिक्षकांचे पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकाने दीड हजार रुपये मागितले; भंडाऱ्यातील उसऱ्याच्या मुख्याध्यापकाला अटक

Video Amravati Fire | कांडलीतील सिलिंडर गोदामाला भीषण आग; दोन किलोमीटरपर्यंत सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज

Video Raosaheb Danve | राणा आणि सोमय्यांवरील हल्ल्याचा राडा! दानवे म्हणतात, कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही, पण…

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.