AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT CET Counselling 2021: अभियांत्रिकी प्रवेशासाठी समुपदेशन नोंदणीला सुरुवात, नेमकी प्रक्रिया काय?

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर समुपदेशन कार्यक्रमाचं वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

MHT CET Counselling 2021: अभियांत्रिकी प्रवेशासाठी समुपदेशन नोंदणीला सुरुवात, नेमकी प्रक्रिया काय?
EXAM
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 11:24 AM
Share

MHT CET Counselling 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल 27 आक्टोबरला जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल कडून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं समुपदेशनाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 2 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे.

प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर समुपदेशन कार्यक्रमाचं वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 2 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी अधिक माहिती आणि तपशीलासाठी अधिकृत वेबसाइट mahacet.org किंवा cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात .

18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

महाराष्ट्रातील महाविद्यालयांतील अभियांक्षिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेच्या निकालानंतरची पुढील पायरी म्हणजे समुपदेशन प्रक्रिया होय.अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी समुपदेशनासाठी इच्छुक उमेदवार 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

समुपदेशनानंतर अंतिम यादी जाहीर होणार

विद्यार्थ्यांचं समुपदेशन केल्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या अंतिम यादीच्या आधारे उमेदवारांना प्रवेश देण्यात येतील.

समुपदेशन वेळापत्रक पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील 28 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. या परीक्षेला 4 लाख 14 हजार 968 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पीसीएम ग्रुपमधील 11 तर पीसीबी ग्रुपमधील 17 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमध्ये 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. पीसीएम म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या गटातील 11 विद्यार्थ्यांनी 100 टक्के पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. तर, पीसीबी म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र गटातील 17 विद्यार्थ्यांनी पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. कोल्हापूरमधील तपन चिकनीस आणि मुंबईतील दिशी विंची यांनी पीसीएम तर नांदेडमधील फातेमा आयमन आणि अनिरुद्ध अनिवळे यांनी पीसीबी ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. पुण्यातील चार विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.

इतर बातम्या:

MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहायचा?

MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार? निकाल कुठं पाहायचा

MHT CET Counselling 2021 Registration Process started for Engineering courses check details at mahacet org

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.