AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded School Reopen : ठरलं, नांदेडमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे नेमके आदेश काय?

31 जानेवारी पासून पाचवी ते आठवीच्या शाळा ( Nanded School Reopen) सुरू होणार, तर सात फेब्रुवारी पासून पहिली ते चौथी या वर्गाच्या शाळा भरणार आहेत.

Nanded School Reopen : ठरलं, नांदेडमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे नेमके आदेश काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:08 PM
Share

नांदेड: नांदेडमध्ये आता कोरोना (Corona) रुग्णसंख्येचा आलेख उतरत्या दिशेने सुरू झाल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 381 जण नव्याने कोरोना बाधित आढळले आहेत, तर 984 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2892 बाधितांवर उपचार सुरू असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे तर बहुतांश बाधित हे गृहविलगिकरणात उपचार घेतायत. सद्यस्थितीत नांदेडमध्ये दररोज दीड हजार अधिक नागरिकांची कोरोना (Corona test) तपासणी केली जात आहे. त्यात आता आढळणाऱ्या रुग्णांत फारशी गंभीर लक्षणे आढळत नसल्याचे चित्र असल्याने तिसरी लाट ओसरते की काय असे चित्र निर्माण झालंय. जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत, आता 31 जानेवारी पासून पाचवी ते आठवीच्या शाळा ( Nanded School Reopen) सुरू होणार, तर सात फेब्रुवारी पासून पहिली ते चौथी या वर्गाच्या शाळा भरणार आहेत. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कोरोना बाधितांची संख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाने आता शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना

राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता1 ली ते 12 वी चे वर्ग दिनांक 24 जानेवारी 2022 पासून सुरु करण्यास सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने स्थानिक परिस्थितीचा विचार करुन महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीचं सुरु

24 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 9 वी ते 12 च्या शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. तसेच इयत्ता 1 ली ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी होत होती.नांदेड जिल्ह्यातील कोविड -19 ची परिस्थिती पाहता दिनांक 31 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 5 वी ते 8 वीच्या तसेच दिनांक 07 फेब्रुवारी 2022 पासून इयत्ता 1 ली ते 4 थीच्या शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश

20 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी संदर्भाांधीन परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसंच वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेल्या संदर्भात देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण 100% पूर्ण करावे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.

इतर बातम्या:

Pimpri Chinchwad | पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील शाळाही 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार; या नियमावलीचे करावे लागणार पालन

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घ्या, बच्चू कडूंच्या अधिकाऱ्यांना सूचना

Nanded Collector Vipin Itankar gave order to school reopen from 31 January

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.