NEET PG Result : नीट पीजी परीक्षेचा रिझल्ट जाहीर, निकाल कुठं पाहायचा?

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नीट पीजी परीक्षेचा (NEET PG 2021) चा निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठीची लिंक अधिकृत वेबसाईट nbe.edu.in वर लवकरच अ‌ॅक्टिव्ह केली जाईल.

NEET PG Result : नीट पीजी परीक्षेचा रिझल्ट जाहीर, निकाल कुठं पाहायचा?
NBE NEET
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 11:16 AM

NEET PG Result नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नीट पीजी परीक्षेचा (NEET PG 2021) चा निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठीची लिंक अधिकृत वेबसाईट nbe.edu.in वर लवकरच अ‌ॅक्टिव्ह केली जाईल. नीट पीजी परीक्षेचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. नीटी पीजी परीक्षा यावर्षी 11 सप्टेंबर 2021 रोजी देशभरातील 260 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि 800 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सर्व प्रवर्गांसाठी कट ऑफ देखील निकालासह जाहीर करण्यात आलं आहे.

NEET PG 2021 निकाल कसा पाहायचा

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाईट nbe.edu.in ला भेट द्यावी. स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: परीक्षा रोलनंबर आणि इतर माहिती नोंदवा स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5: निकालाची प्रत डाऊनलोड करु ठेवा

कट ऑफ मार्क्स

प्रवर्गापात्रता पर्सेंटाईल गुण800 पैकी कट ऑफ
खुला50 पर्सेंटाईल गुण302
एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग 40 पर्सेंटाईल गुण265
दिव्यांग (खुला)45 पर्सेंटाईल गुण283

NEET PG परीक्षा का घेतली जाते?

NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे.

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) प्रगत 2021 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. जेईई प्रगत परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपलोड करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते फक्त या संकेतस्थळावरून त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील. परीक्षेचे हे प्रवेशपत्र (IIT JEE Admit Card 2021) परीक्षेच्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत डाऊनलोड करता येईल. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाईल. आम्ही तुम्हाला सांगू की फक्त तेच विद्यार्थी IIT JEE परीक्षेत भाग घेतात ज्यांची रँक JEE Main मध्ये 2.5 लाखांच्या आत येते.

अडीच लाख विद्यार्थी सहभागी होतील

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

NEET 2021 : नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल

Medical Courses Without NEET : नीटशिवाय देखील वैद्यकीय क्षेत्रात बनवू शकता करियर, या कोर्सने कमवू शकता चांगले पैसे

Neet pg 2021 result declared check at nbe.edu.in for more details

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.