NEET PG Counselling 2021 Live : वैद्यकीय अभ्यासक्रमातील EWS आरक्षणाचं काय होणार? सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करणार

सुप्रीम कोर्ट (Supreme Court)वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसींच्या (OBC) 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या (EWS) 10 टक्के आरक्षणासह नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे

NEET PG Counselling 2021 Live : वैद्यकीय अभ्यासक्रमातील EWS आरक्षणाचं काय होणार? सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करणार
ऑर्केस्ट्रा बारमधील परफॉर्मन्ससाठीची महाराष्ट्र सरकारची 'ही' अट रद्द
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 8:32 AM

NEET PG Counselling 2021 latest news in Marathi नवी दिल्ली: सुप्रीम कोर्ट (Supreme Court)वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसींच्या (OBC) 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या (EWS) 10 टक्के आरक्षणासह नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टाकडून निर्णय जाहीर केला जाईल, त्यापूर्वी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्यासमोर होत आहे. नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेसंदर्भातील सुनावणी लवकर घेण्याची मागणी केंद्रानं कोर्टाकडे केली होती ती मान्य करण्यात आली होती.

नीट पीजी समुपदेशनाच्या तातडीच्या सुनावणीला सरन्यायाधीशांची मंजुरी

नीट पीजी समुपदेशनाला उशीर होत असल्यानं नवी दिल्लीमध्ये निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं होतं. यापार्श्वभूमीवर कोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याप्रकरणी सरन्यायाधीश एन वी रमणा यांच्याकडे मागणी केली होती. सरन्यायाधीश एन वी रमणा यांनी ती विनंती मान्य केली होती. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाचा समावेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

केंद्र सरकारकडून 8 लाख उत्पन्न मर्यादेचं समर्थन

नीट पीजी मधील ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी ओबीसी प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादा कशी निश्चित करण्यात आली असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला होता. त्यावर केंद्राकडून आठ लाख उत्पन्न मर्यादेचं समर्थन करण्यात आलं होतं. आठ लाख रुपयांची उत्पन्न निश्चित करताना केंद्रानं नव्या अटी जाहीर केल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमदेवारांसाठीची कमाल उत्पन्नाची अट बदलल्यास नीट पीजी समुपदेशन कार्यक्रमाला आणखी उशीर होईल, अशी बाजू केंद्र सरकारच्यावतीनं तुषार मेहता यांनी मांडली.

पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असणारे ईडब्ल्यूएससाठी अपात्र

आठ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. पाच एकर शेतजमीन किंवा त्याहून अधिक शेतजमीन असणारे शेतकरी कुटुंब, अधिसूचित नगरपालिका आणि महापालिकांमधील 100 चौ. फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राचा प्लॉट आणि अधिसूचित नसलेल्या नगरपालिकांमधील 200 चै. फूट प्लॉट नावावर असणारे व्यक्ती आणि ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावरील घर असेल त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही.

इतर बातम्या:

Neet : ‘नीट’संबंधी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात उद्या निकाल; पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याच्या सूचना

‘आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

NEET PG Counselling 2021 live updates ews obc reservation supreme court will announced ruling today latest news in marathi

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.