AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG 2022: नीट युजी 2022 चा निकाल आज! स्कोअरकार्ड कुठे डाऊनलोड करणार?

याशिवाय उमेदवारांना नीट यूजीचा निकाल तपासण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. हा निकाल तपासण्यासाठी उमेदवार nta.ac.in आणि ntaresults.nic.in वेबसाइटला भेट देऊ शकतात.

NEET UG 2022: नीट युजी 2022 चा निकाल आज! स्कोअरकार्ड कुठे डाऊनलोड करणार?
NEET UG 2022Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 07, 2022 | 10:10 AM
Share

आज नीट युजी 2022 (NEET UG 2022) चा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवार हा निकाल नीट युजी च्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) जाऊन तपासू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आज 7 सप्टेंबर रोजी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट-यूजी 2022) चा निकाल जाहीर करण्यात येण्यात आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे एनईईटी यूजी स्कोअरकार्ड डाउनलोड (Download Scorecard) करू शकतात. याशिवाय उमेदवारांना नीट यूजीचा निकाल तपासण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. हा निकाल तपासण्यासाठी उमेदवार nta.ac.in आणि ntaresults.nic.in वेबसाइटला भेट देऊ शकतात.

एनईईटी यूजी निकाल 2022 कसा डाउनलोड करावा?

  • एनईईटी यूजी निकाल तपासण्यासाठी, neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर तुम्हाला नीट रिझल्ट 2022 लिंक दिसेल.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर नीट यूजी रिझल्ट पाहता येईल.
  • निकाल डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या.

याआधी नीट युजी ची आन्सर कि जाहीर करण्यात आली. आन्सर कि मुळे विद्यार्थ्यांना आपल्या स्कोअरचा अंदाज आधी आलेला आहे. आता आज अंतिम निकाल असेल.

नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. नीट यूजी परीक्षेसाठी 18.72 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, केवळ ९५ टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

विद्यार्थ्यांची संख्या 18 लाखांहून अधिक असण्याची ही पहिलीच वेळ आहे. 18 लाखांहून अधिक उमेदवारांपैकी 10.64 लाख मुली होत्या.

गेल्या वर्षी नीट युजी परीक्षेत 15.44 लाख उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यापैकी 8.70 लाख उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.

यावर्षी, एनईईटी यूजी परीक्षा 497 शहरांमध्ये स्थापन केलेल्या 3,570 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती