AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG Result 2025 Declared: NTA कडून नीट यूजी 2025 रिझल्ट जाहीर, पटापट असा चेक करा निकाल

NEET UG Result 2025 Out : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा नीट यूजी 2025 चा निकाल जाहीर केला आहे आणि टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार रिझल्ट कसा चेक करू शकतील, जाणून घ्या पटापट..

NEET UG Result 2025 Declared: NTA कडून नीट यूजी 2025 रिझल्ट जाहीर, पटापट असा चेक करा निकाल
नीट यूजी 2025 रिझल्ट जाहीरImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Updated on: Jun 14, 2025 | 2:14 PM
Share

नीट यूजी 2025 रिझल्ट जाहीर झाला आहे. neet.nta.nic.in या ्धिकृत वेबसाईटवर जाऊन, या परीक्षेस बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल चेक करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए (NTA) ने पास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण आणि नीट यूजी टॉपर्सची यादी देखील जाहीर केली आहे.

NEET UG 2025 Result: असा चेक करा नीट यूजी 2025 रिझल्ट

सर्वात पहिले NEET च्या ऑफिशिअल वेबसाईटवर neet.nta.nic.in – यावर जावे.

त्यानंतर होमपेजवर ‘NEET UG 2025 रिझल्ट’ या लिंकवर क्लिक करावे.

त्यानंतर तुमचे लॉगिन क्रेडेंशिअल, उदा. ॲडमिशन कार्ड नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करावे.

ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा नीट यूजी 2025 रिझल्ट दिसेल.

त्यानंतर तुम्ही तुमचं स्कोअकार्ड डाऊनलोड करू शकता.

NEET UG 2024 Topper: 2024 साली रूपायन मंडल ने केलं होतं टॉप

गेल्या वर्षी, अनेक विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यापैकी एक होता रूपायन मंडल, जो पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने 720 पैकी 720 गुण मिळवले. त्यानंतर रुपायनने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो नववीत असतानाच त्याने नीट परीक्षेची तयारी सुरू केली होती आणि त्यासाठी त्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारचे कोचिंग घेतले होते. त्याचे वडील स्वतः भौतिकशास्त्राचे शिक्षक असल्याने त्याला फिजीक्सची तयारी करण्यात फारशी अडचण आली नाही. त्यांनी रूपायनला फिजीक्सची तयारी करण्यात खूप मदत केली. वडिलांच्या पाठिंब्यामुळेच त्याने NEET परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 मिळवला.

भारतात किती मेडिकल सीट ?

NEET UG निकालात मिळालेल्या गुणांच्या आधारे, देशभरातील एकूण 780 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. 2025 पर्यंत भारतात 1 लाख 18 हजार 190 MBBSच्या जागा, 27 हजार 868 BDSच्या जागा, 1 हजार AIIMS च्या जागा आणि 200 JIPMER जागा उपलब्ध आहेत.

काऊन्सिलिंग प्रक्रिया

NEET UG 2025 च्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश दोन मुख्य कोट्यांनुसार दिला जातो – अखिल भारतीय कोटा (AIQ) आणि राज्य कोटा. अखिल भारतीय कोट्यात (AIQ) सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या 15% जागा, सर्व AIIMS, JIPMER आणि इतर केंद्रीय संस्थांच्या जागा समाविष्ट आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागांपैकी 85 % आणि सर्व खाजगी/अभिमत विद्यापीठांच्या जागांसाठी राज्य कोटा हा एक महत्त्वाचा भाग आहे. AIQ समुपदेशन जुलै 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतं.निकालानंतर MCC कडून नेमक्या तारखा जाहीर केल्या जातील.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.