Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती

परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) कार्यक्रमासाठी 10.39 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:56 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) हा कार्यक्रम बुधवारी 7 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत 7 एप्रिलला सांयकाळी 7 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन केलं आहे. परीक्षा पे चर्चा प्रथमच ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. (Pariksha Pe Charcha 2021 Narendra Modi to interact with students on April 7 at 7 pm)

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांनी #ExamWarriors हा हॅशटॅग वापरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा नवीन प्रकार, विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बुधवारी 7 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

परीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होतं?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे यंदाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. 16 फेब्रुवारी 2018 ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.

परीक्षा पे चर्चामध्ये प्रथमच पालकांना संधी

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे. innovateindia.mygov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती.

प्रकाश जावडेकरांकडून परीक्षा पे चर्चाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुन्हा ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. जावडेकर यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘koo’ वरून यासंबंधी माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा 2021 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील.

जावडेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘अखेर प्रतिक्षा संपली! परीक्षा पे चर्चा 2021, प्रेरणादायी कार्यक्रमातून नरेंद्र मोदी पुन्हा आले आहेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे. त्यांच्याशी संवाद साधा, परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांच्याकडून मंत्र जाणून घ्या. ते फक्त परीक्षेत मदतच नाही तर आयुष्यावरही मार्गदर्शन करतील.’ असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 8 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, पालकांना प्रथमच संधी

‘परीक्षा पे चर्चा’ मधून पंतप्रधान पुन्हा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, प्रकाश जावडेकरांची Koo वरून माहिती

(Pariksha Pe Charcha 2021 Narendra Modi to interact with students on April 7 at 7 pm)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.