School Reopen : शाळा सुरु करण्याबाबत पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय, राजेश टोपे यांची माहिती

शाळा सुरु करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

School Reopen : शाळा सुरु करण्याबाबत पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय, राजेश टोपे यांची माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 7:25 AM

औरंगाबाद : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शाळा सुरु (School Reopen) करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय कोरोना केसेस (Corona Cases) कमी असतील त्या ठिकाणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी चर्चा झाली होती. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. त्यामुळं शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्णसंख्या आणि सद्यस्थिती पाहता शाळांबाबत घेतलेल्या निर्णयचा फेरविचार करता येईल. शाळांबद्दल आठ पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील पालकांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं सांगितलं. मात्र, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

येणाऱ्या कॅबिनेटमध्ये योग्य निर्णय

राज्यात कोरोना काळात कायमस्वरूपी शाळा बंदचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत. पुढील आठवडा भरात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. येत्या दहा पंधरा दिवसात पुन्हा शाळा सुरु करण्याची स्थिती असेल तर आढावा घेऊन निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल, तिथं शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

शाळांबाबत पालकांमध्ये दोन मतप्रवाह

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळं पालकांमध्ये शाळा सुरू करण्याविषयी दोन मतप्रवाह आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील पालकांमध्ये शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन प्रवाह आहेत, अशी माहिती दिली. मात्र, आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन येणाऱ्या कॅबिनेट मध्ये योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

क्वारंटाईमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्याची गरज

कोरोना बाधित जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत त्या रुग्णांवर लक्ष आहे. सध्याच्या सक्रीय रुग्णांपैकी 87 टक्के जण घरी आहेत. आजार वाढला तर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणेवर आहे. होम क्वारंटाईनसंदर्भातील सूचना जिल्ह्याच्या प्रशासनाला दिल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा असून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी कोरोना किट संदर्भात निर्णय घ्यावा, असं राजेश टोपे म्हणाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली ते औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते.

इतर बातम्या:

Dhanush Aishwarya Divorce : अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट; 18 वर्षानंतर दोघांचाही वेगळं होण्याचा निर्णय

हायप्रोफाइल सीएचा व्हिडिओ बनवून पैशांची मागणी करणाऱ्या तीन समलिंगींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rajesh Tope said school reopen decision will take in next week during Cabinet meeting

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.