KVS Admission 2021 : केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी 1 एप्रिलपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

KVS Admission 2021 : केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी 1 एप्रिलपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती
केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी 1 एप्रिलपासून नोंदणी सुरू

दुसरी इयत्ता आणि त्याच्या वरच्या इयत्तेसाठी ऑफलाईन नोंदणी करावी लागेल. ऑफलाईन नोंदणी 8 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. (Registration for admission to Kendriya Vidyalaya starts from 1st April, know full details)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 27, 2021 | 10:27 PM

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयात (KVS Admission 2021-22) प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया 1 एप्रिल 2021 पासून सुरू होत आहे. नोंदणी पोर्टल 1 ते 19 एप्रिल दरम्यान खुले असेल. देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये (KVS Admission 2021-22 Date Class 1) पहिल्या वर्गासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी पहिल्या इयत्ते प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी 1 एप्रिलपासून सुरू होईल. दुसरी इयत्ता आणि त्याच्या वरच्या इयत्तेसाठी ऑफलाईन नोंदणी करावी लागेल. ऑफलाईन नोंदणी 8 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. (Registration for admission to Kendriya Vidyalaya starts from 1st April, know full details)

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा

अधिक माहितीसाठी सर्व आवश्यक लिंक देखील दिल्या आहेत. पहिल्या इयत्तेत (KVS Admission 2021-22 Date Class 1) प्रवेशासाठी नोंदणी 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोंदणी सुरु राहिल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी https://kvsonlineadmission.kvs.gov.in वेबसाईटला भेट द्या. प्रवेशासाठी अ‍ॅपशी संबंधित कोणतीही माहिती घ्यायची असल्यास https://kvsonlineadmission.kvs.gov.in/apps या वेबसाईटला भेट द्या. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले जाऊ शकते.

ऑफलाईन मोडमध्ये केली जाईल नोंदणी

याशिवाय दुसरी आणि याच्या वरच्या वर्गासाठी नोंदणी जागेच्या उपलब्धतेवर आधारीत असेल, ज्यांची ऑफलाईन प्रक्रिया 8 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल आणि 15 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल. ज्या विद्यार्थ्यांना अकरावी (KVS Admission 2021-22 Date Class 11) मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी https://kvsangathan.nic.in वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा. यात निश्चित वेळापत्रकाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

31 मार्चपर्यंत वयाची गणना

सर्व वर्गातील प्रवेशासाठी वयाची गणना 31 मार्च 2021 पर्यंत केली जाईल. केंद्रीय विद्यालयात प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार जागांचे आरक्षण केले जाईल. याची माहिती https://kvsangathan.nic.in वेबसाईटवर देण्यात आली आहे. केव्हीएसने कोविड-19 च्या परिस्थितीचा विचार करता पालकांनी सर्व आवश्यक उपाययोजनांचे अनुसरण करण्याची विनंती केली आहे. सध्या केंद्रीय विद्यालय संघटना 1247 केव्हीची मालिका चालवित आहे.

गुणवत्ता यादी सार्वजनिक करणे बंधनकारक

सर्व शाळांना प्रवेशाची गुणवत्ता यादी सार्वजनिक करणे बंधनकारक असेल. यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांग, सिंगल गर्ल, डिफेन्स आणि सेंट्रल एम्प्लॉईज कॅटेगरी अंतर्गत जागा वाटपाची माहिती असेल. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक बनविणे हा त्याचा हेतू आहे. 2020 मध्ये केव्ही प्रवेशासाठी ओबीसी आरक्षणाचे नियम लागू झाले आहेत. एका विभागात केवळ 40 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. (Registration for admission to Kendriya Vidyalaya starts from 1st April, know full details)

इतर बातम्या

Video | रेल्वेस्थानकामध्ये शिरला महाकाय हत्ती; पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

Yusuf Pathan Corona : सचिन तेंडुलकर पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका धडाकेबाज माजी खेळाडूला कोरोनाची लागण

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें