RTE च्या प्रवेशांना आणखी एकदा मुदतवाढ, 23 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन

आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2021-22 करीताच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार निवड झालेल्या पाल्‍याचा प्रवेश घेण्‍यासाठी आता दिनांक 23 जुलै, 2021 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

RTE च्या प्रवेशांना आणखी एकदा मुदतवाढ, 23 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन
आरटीई प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 6:43 PM

मुंबई: आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2021-22 करीताच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार निवड झालेल्या पाल्‍याचा प्रवेश घेण्‍यासाठी आता दिनांक 23 जुलै, 2021 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता पात्र खासगी विना-अनुदानित शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (entry level) वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या राखीव जागांवर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येऊन प्रवेश दिले जातात.

23 जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई 25 टक्के अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना दिनांक 30 जून 2021 पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा होता. मात्र, सदर प्रवेशासाठी आता दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडील 2468 पदं रिक्त

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 352 शाळांमधील 6 हजार 463 जागांपैकी प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या 4 हजार 985 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 517 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. मात्र, अद्यापही निवड यादीतील 2 हजार 468 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित न झाल्यामुळे ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता आता दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अजुनही ज्या पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी शाळेशी संपर्क साधला नाही, त्यांनी दिनांक 23 जुलै 2021 पूर्वी शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

आरटीईअंतर्गत किती जागांवर प्रवेश

मुंबईमधध्ये आरटीई साठी 352 शाळांमध्ये 6 हजार 463 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामधील 292 शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित आहेत तर 62 शाळा राज्य सरकारच्या शिक्षण बोर्डाशी संलग्नित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 96801 जागांवर या कायद्यांतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. राज्याच्या 36 जिल्ह्यातील 9 हजार 431 शाळांमध्ये 25 टक्के जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

RTE च्या 25 टक्के राखीव जागांची सोडत जाहीर, पालकांना ‘या’ तारखेपासून प्रवेशाची सूचना मिळणार

RTE अंतर्गत प्रवेश नोंदणी सुरु, 96 हजार विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण

Right to Education admission finalization date extend till 23 July

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.