लग्नानंतर पतीकडून बेदम मारहाण, अंतर्वस्त्रात पोळी लपवून खायची… तरी लढा देऊन ती कशी बनली ऑफीसर ? वाचा तिचा प्रवास

Savita Pradhan Success Story : सविताला सगळ्यांसोबत डायनिंग टेबलवर बसून जेवण करण्याची परवानगी नव्हती. ना तिला मनमोकळेपणे हसता येत असे. बेदम मारहाण आणि त्रास सोसूनही तिने लढा दिला आणि आज ती एक यशस्वी ऑफिसर आहे.

लग्नानंतर पतीकडून बेदम मारहाण, अंतर्वस्त्रात पोळी लपवून खायची... तरी लढा देऊन ती कशी बनली ऑफीसर ? वाचा तिचा प्रवास
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 11:38 AM

ग्वाल्हेर : आजच्या काळात मध्य प्रदेशमध्ये तैनात असलेल्या सविता प्रधान (Savita Pradhan) हिची अत्यंत हुशार ऑफिसर्समध्ये गणना केली जाते. ती सध्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक म्हणून कार्यरत आहे. मात्र, सविताचा इथपर्यंतचा प्रवास खूप वेदनादायी होता. इथे पोहोचण्यापूर्वी ती आत्महत्येसारखे (suicide) टोकाचे पाऊल उचलणार होती. अधिकारी होण्याआधी सविताने सासरी प्रचंड त्रास सहन केला आहे. तिचा नवरा तिला नाहक मारहाण करायचा, सासरचे लोकही तिचा छळ करत असत. एवढेच नव्हे तर एकेकाळी परिस्थिती अशी होती की, भूक लागल्यावर नवऱ्याच्या भीतीने सविता आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये पोळ्या लपवून त्या खायची हा अत्याचार सहन करत एके दिवशी सविताने आत्महत्येचा निर्णय घेतला, पण त्यावेळी असे काही घडले, की तिचे जीवन बदलले. त्यानंतर सविताने जिद्द आणि चिकाटी दाखवत अथक परिश्रम केले आणि अधिकारी झाली. एवढेच नव्हे तर तिने तिच्या पतीला चांगलाच धडाही शिकवला.

10 वी पास करणारी गावातील पहिली मुलगी होती.

सविताचा जन्म मध्य प्रदेशातील मंडी नावाच्या गावात आदिवासी कुटुंबात झाला. ती त्याच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. तथापि, असे असूनही, ती तिच्या गावातील पहिली मुलगी होती, जी दहावी उत्तीर्ण झाली. मात्र, आई-वडिलांनी तिला शिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे, शिक्षणासाठी तिच्या कुटुंबीयांना 150 ते 200 रुपयांची शिष्यवृत्ती मिळत असे.

शाळेत जाण्यासाठी हातात 2 रुपयेसुद्धा नव्हते

दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सविताला गावापासून ७ किमी दूर जावे लागायचे. तिथे जाण्या-येण्यासाठी तिला 2 रुपयांचा खर्च यायचा. पण त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की तिच्याकडे ते दोन रुपयेही नव्हते, त्यामुळे तिला अनेकदा पायीच शाळेत जावे लागत होते. त्यानंतर ज्या गावात सविताची शाळा होती त्याच गावात तिच्या पालकांना काम मिळाले. शालेय शिक्षणादरम्यानच सविताला एका मोठ्या घरातून लग्नासाठी मागणी घालण्यात आली. ते कुटुंब खूप मोठं प्रस्थ होतं, त्यामुळे सविताची इच्छा जाणून न घेता तिचे लग्न लावण्यात आले.

नवऱ्याच्या भीतीने अंतर्वस्त्रात लपवायची पोळी

लग्नानंतर काही दिवसातच सविताला नोकरांसारखी वागणूक मिळू लागली. सासरच्या घरी तिला खूप काबाडकष्ट करायला लागले. सासरी तिच्यावर अनेक बंधने लादण्यात आली होती. तिला डायनिंग टेबलवर बसून सर्वांसोबत जेवायची परवानगी नव्हती ना मोकळपणे हसायची. घरातल्या सर्वांचे जेवण झाल्यावर तिला शेवटी जेवायला लागायचे. पण त्यातच जर अन्न संपले असेल तर तिला पुन्हा स्वत:साठी स्वयंपाकही करता यायचा नाही. एकेकाळी तिची इतकी बिकट परिस्थिती होती की, पती मारेल या भीतीने ती पोळ्या अंतर्वस्त्रात लपवून बाथरूममध्ये घेऊन जायची आणि तिथेच बसून जेवायची.

कायम व्हायची मारहाण

काही दिवसांनी सविताला ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. मुलगा होऊनही तिच्या आयुष्यात काहीच सुधारणा झाली नाही. नंतरही सासरची मंडळी तिच्याशी तशीच वागायची. काही काळाने तिला दुसरे मूल झाले, पण नवऱ्याची मारहाण सतत सुरूच होती.

आत्महत्या करण्याचाही केला प्रयत्न

या सर्व जाचाला कंटाळून एके दिवशी सविताने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. छताच्या पंख्याला गळफास घेत असताना तिची नजर सासूवर पडली. खरे तर योगायोगाने खोलीची खिडकी उघडी राहिली होती. मात्र, सविताच्या सासूने तिला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सगळं बघून ती पुढे निघाली. तेव्हा सविताच्या लक्षात आले की ती अशा लोकांसाठी आपल्या प्राणाची आहुती का देत आहे. यानंतर तिने तिचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या दोन्ही मुलांसह तिथून निघून गेली. कमाईसाठी तिने ब्युटी पार्लरमध्येही काम केले. यानंतर, तिने इंदूर विद्यापीठातून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी नागरी सेवा परीक्षा (Civil Services Exam) उत्तीर्ण केली.

पतीला घडवली चांगली अद्दल

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सविता अधिकारी झाल्या, तेव्हा तिची पहिली पोस्टिंग मुख्य पालिका अधिकारी म्हणून झाली. तिची प्रगती पाहून तिचा नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात आला. मात्र त्याने पुन्हा सविताला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या पतीला धडा शिकवण्याचा विचार केला. अत्यंत दुःखी मनाने तिने हा सर्व प्रकार वरिष्ठांना सांगितला. तेव्हा तिच्या वरिष्ठांनी तिचा नवरा तिच्याकडे परत आला तर लगेच फोन करून कळवण्यास सांगितले.

त्यानंतर एके दिवशी तिचा नवरा पुन्हा घरी आला. तो तिला पुन्हा मारहाण करणार हे सविताला आधीच कळले होते. त्यामुळे सविताने लगेच तिच्या वरिष्ठांना फोन केला. काही वेळातच पोलीस घरात आले. आणि तिच्या नवऱ्याचा चांगलीच अद्दल घडवली. आता सविताने पतीपासून घटस्फोट घेतला असून ती तिच्या दोन मुलांसह सुखाने जगत आहे.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.