सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना शॉक, गुणवत्ता सुधार योजनेच्या निधीला 8 कोटींची कात्री

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं निधीतमध्ये कपात करुन महाविद्यालयांना शॉक दिला आहे. Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना शॉक, गुणवत्ता सुधार योजनेच्या निधीला 8 कोटींची कात्री
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं निधीतमध्ये कपात करुन महाविद्यालयांना शॉक दिला आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या गुणवत्ता सुधार योजनेला थेट तब्बल 8 कोटींची कात्री लावली आहे. विद्यापीठानं निधी कपात केल्यानं महाविद्यालयांमध्ये संतापाचं वातावरण आहे. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. (Savitribai Phule Pune University cut fund of affiliated colleges by 8 crore rupees)

निधीची गरज असताना कपात

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची आवश्‍यकता असताना विद्यापीठाने निधीत कपात केलीय. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये या निर्णयामुळे संतापाचं वातावरण आहे.

केवळ पाच कोटीने काय होणार?

गुणवत्ता सुधार योजनेतील निधीला 8 कोटींची कात्री लावण्यात आली आहे. आता फक्त 5 कोटी देण्यात येणार आहेत. त्या 5 कोटी रुपयांनी काय होणार आहे, अशी टीका देखील महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या निधीवर सर्वांचा अधिकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निधीवर केवळ तेथील विभागांचाच अधिकार नाही, अशी टीका महाविद्यालयांकडून करण्यात आलीय. तर, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी गुणवत्ता सुधार योजना सुरु केली होती. त्यामध्ये महाविद्यालयांना व विद्यापीठाच्या विभागांना परिषदा, चर्चासत्र यासह महाविद्यालयासाठी आवश्‍यक वस्तू घेण्यासाठी मदत केली जात होती.

विद्यापीठाच्या परीक्षा 11 एप्रिलपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले जाणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. मात्र, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर आयोजित कराव्यात, असे विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे. प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार 70 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत.

संबंधित बातम्या:

रविवारीसुद्धा विद्यार्थ्यांच्या परीक्षा, पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर नियमावली…

राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे जवळपास 150 कोटी थकवले!

(Savitribai Phule Pune University cut fund of affiliated colleges by 8 crore rupees)