कोरोना संसर्गामध्ये शाळा बंद ठेवणं अयोग्यच, आता परिस्थिती बदललीय, जागतिक बँकेच्या तज्ज्ञांचं मत

कोरोना विषाणू संसर्ग (Corona Virus) आणि नवनव्या येणाऱ्या वेरियंटच्या परिस्थितीत शाळा बंद (School Close ) ठेवणं अयोग्य असल्याचं मत जागतिक बँकेचे (World Bank) ग्लोबल एज्युकेशन डायरेक्टर जैमी सावेंद्र यांनी व्यक्त केलंय

कोरोना संसर्गामध्ये शाळा बंद ठेवणं अयोग्यच, आता परिस्थिती बदललीय, जागतिक बँकेच्या तज्ज्ञांचं मत
School
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 1:24 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग (Corona Virus) आणि नवनव्या येणाऱ्या वेरियंटच्या परिस्थितीत शाळा बंद (School Close ) ठेवणं अयोग्य असल्याचं मत जागतिक बँकेचे (World Bank) ग्लोबल एज्युकेशन डायरेक्टर जैमी सावेंद्र यांनी व्यक्त केलंय. जैमी सावेंद्र यांच्या टीमनं कोरोनाचा शिक्षण व्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला. शाळा सुरु केल्यामुळं कोरोना ससंर्ग होतो किंवा कोरोनाचे रुग्ण वाढतात याला पुरावा आढळत नाही. शाळा सुरक्षित नाहीत, असंही म्हणता येत नसल्याचं जैमी सावेंद्र यांनी म्हटलं आहे. मुलांचं लसीकरण होईपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात असं म्हटलं जातं, यामध्ये कोणतंही शास्त्रीय कारण नसल्याचं जैमी सावेंद्र यांनी स्पष्ट केलंय. कोरोनाचा संसर्ग आणि शाळा सुरु करणे यामध्ये कोणताही संबंध नाही. शाळा आणि कोरोनाची लाट हे जोडणं योग्य नसून तसं जोडण्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नसल्याचं जैनी सावेंद्र यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

रेस्टॉरंट, मॉल, बार सुरु आणि शाळा बंद कशा?

जैनी सावेंद्र यांनी रेस्टॉरंट, बार आणि शॉपिंग मॉल सुरु आहे आणि शाळा बंद ठेवण्यात आलंय हे कसं चालणार असं त्यांनी म्हटलंय. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार आता शाळा सुरु असतील तर त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अधिक सुरक्षित आहेत. तर, बंद ठेवल्या तर त्या जास्त धोकादायक ठरतील, असं जैनी सावेंद्र यांनी म्हटलं आहे.

कोरोनाशी कसं लढायचं हे माहिती झालंय

2020 मध्ये कोरोना लाट आली त्यावेळी आपल्याला कोरोना संसर्गाशी कसं लढायचं हे माहिती नव्हतं. आता आपल्याला कोरोना संसर्गालास कसं सामोरं जायचं हे माहिती झालं आहे. आता 2020 आणि 2021 मधील परिस्थिती वेगळी असून काही देशांनी कोरोना संसर्गाच्या लाटा येऊनही शाळा उघडल्या असल्याचं जैनी सावेंद्र म्हणाले.

मुंबई आणि ठाण्यात शाळा बंद राहणार

मुंबई आणि परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही वाढत असल्याने या परिसरातील इंग्रजी आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तुर्तास सुरू होणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज ‍असोसिएशनने (मेस्टा) या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबई, ठाणे परिसरात या शाळा सुरू करता येणार नसल्याने विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मेस्टाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याने सांगत आपल्याशी संबंधित असलेल्या 18 हजाराहून अधिक शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला मुंबई, ठाणे परिसराचा अपवाद असणार आहे.

इतर बातम्या:

N. D. Patil dies: शिक्षणप्रेमी, कष्टकरी, सामान्यांचा लढवय्या नेता; वाचा, एन. डी. पाटील यांचा अल्पपरिचय

आमदार नितेश राणेंना मोठा झटका, हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन फेटाळला

School Reopen World Bank experts Jaime Saavedra said there is no justification in keeping school closed

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.