N. D. Patil dies: शिक्षणप्रेमी, कष्टकरी, सामान्यांचा लढवय्या नेता; वाचा, एन. डी. पाटील यांचा अल्पपरिचय

N. D. Patil dies: शिक्षणप्रेमी, कष्टकरी, सामान्यांचा लढवय्या नेता; वाचा, एन. डी. पाटील यांचा अल्पपरिचय
N D Patil

पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते, कष्टकरी, सामाजिक चळवळीतील कार्याचा वटवृक्ष आणि शिक्षणप्रेमी नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 17, 2022 | 12:47 PM

कोल्हापूर: पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते, कष्टकरी, सामाजिक चळवळीतील कार्याचा वटवृक्ष आणि शिक्षणप्रेमी नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे. एन. डी. पाटील यांच्या जीवन चरित्राचा घेतलेला हा आढावा.

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

 जन्म : 15 जुलै 1929 – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म,

 शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,1955; एल.एल.बी.( 1962 ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

1954- 1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर, 1960 साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

 शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य 1962, शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य 1965, शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य 1962-1978, शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन 1976-1978, सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य 1991, रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- 1959 पासून, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – 1990 पासून, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – 1985 पासून

राजकीय कार्य

1948 – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश, 1957 – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस, 1960-66,1970-76,9176-82 अशी 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, 1969- 1978, 1985 – 2010 – शे.का.प.चे सरचिटणीस, 1978-1980 – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य, 1985-1990- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी ), 1999-2002 – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार –1994, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, 1999, राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – 1998 – 2000, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, 2000, विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- 2001, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे

 रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष, अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष, जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक, म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका), शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) 1962, कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) 1962, शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) 1963, वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) 1966, महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) 1967, शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक ) 1970, शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) 1992, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका ), नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , 2001(नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात: औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक, दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

संबंधित बातम्या:

N. D. Patil Death : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं, राज्यावर शोककळा

VIDEO: शाळा सुरू ठेवाव्यात की ठेवू नये?, सुप्रिया सुळे यांनी सूचवला उपाय; राजेश टोपेंशीही चर्चा करणार

Photos : गुड न्यूज… मुलगी झाली हो! शक्ती आणि करिष्माच्या घरी ‘बेटी धनाची पेटी’; राणीच्या बागेत आनंदी आनंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें