AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

N. D. Patil Death : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं, राज्यावर शोककळा

ND Patil Passed Away News : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

N. D. Patil Death : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं, राज्यावर शोककळा
एन डी पाटील,ज्येष्ठ नेते
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 1:27 PM
Share

कोल्हापूर: शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

डॉ. अशोक भूपाळी यांनी सकाळी प्रकृती विषयी दिलेली माहिती

डॉ.अशोक भूपाळी (Dr. Ashok Bhupali) यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. एन.डी. पाटील सर 8 वर्ष आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे, 11 जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अ‌ॅडमिट केलं गेलं होत, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणताही मोठी उपचार केले नाहीत, असं डॉ. भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता, असं डॉ. अशोक भूपाळी म्हणाले होते.

मे 2021 मध्ये कोरोनावर मात

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना मे 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली.

सामाजिक, राजकीय जीवनात सर्वसामान्यांसाठी काम

एन.डी. पाटील यांचं पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असं होतं. सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) अशिक्षित शेतकरी कुटुंबात 15 जुलै 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी एम.ए. ( अर्थशास्त्र )चे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं होतं. त्यांनी एल.एल.बी. देखील केलं होतं. एन.डी. पाटील यांनी 1954-1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. 1960 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून कामं केलं. शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलंय. शेकापमध्ये एन.डी. पाटील यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी काम केलं.

एन.डी. पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा

खासदार संभाजी छत्रपती यांनी एन डी पाटील हे मोठं व्यक्तिमत्त्व होतं, त्यांनी मोठं सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या सारख व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. एन.डी पाटील हे मोठं व्यक्तिमत्व होतं, असंही ते म्हणाले.

चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं : राजू शेट्टी

एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची, असं राजू शेट्टी म्हणाले. टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला, असं राजू शेट्टी म्हणाले.

एन.डी. पाटील यांच्या रुपानं झुंजार नेता हरपल्याची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. वयाच्या 90 व्या वर्षीदेखील त्यांनी रस्त्यावर लढा उभारल्याचं ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारामध्येही त्यांनी काम केल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.

संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर एन.डी . पाटील : चंद्रकांत पाटील

संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर एन.डी . पाटील हे होय. टोलच्या आंदोलनासारखा मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. एन.डी. पाटील यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरुन निघणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. विरोधी पक्षात असूनही माझ्यावर त्यांच विशेष प्रेम होतं. टोलच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या सोबत आंदोलन केलं. टोलची खोकी गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर होतं. गोविंद पानसरे यांच्या जाण्यानं त्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, सहकारी गेल्यानं कोलमडून पडणारे ते नव्हते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या: 

N. D. Patil dies: शिक्षणप्रेमी, कष्टकरी, सामान्यांचा लढवय्या नेता; वाचा, एन. डी. पाटील यांचा अल्पपरिचय

VIDEO: शाळा सुरू ठेवाव्यात की ठेवू नये?, सुप्रिया सुळे यांनी सूचवला उपाय; राजेश टोपेंशीही चर्चा करणार

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.