UPSC Result 2021: कोकणचो पोर, कोकणचो अभिमान! पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा यूपीएससी रँकर, पोलीस खात्यासाठी करणार काम

पोलीस खात्याच्या नोकरीमुळे बरेचदा मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. मुलाने मेहनत केली. त्याने त्याचा मार्ग निवडला, आपली प्रगती कशी करायची हे त्याने त्याचं ठरवलं आणि लागेल तितकी मेहनत करून त्याला जे हवंय त्याने ते मिळवलं. ठरवलं आणि करून दाखवलं असं मत चेतन पंदेरेंच्या वडिलांनी यावेळी व्यक्त केलंय.

UPSC Result 2021: कोकणचो पोर, कोकणचो अभिमान! पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा यूपीएससी रँकर, पोलीस खात्यासाठी करणार काम
चेतन पंदेरे, कोकणचो अभिमान!Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 6:02 PM

रत्नागिरी: पहिल्यांदाच पोलीस कमिश्नरचा (Police Commissioner) मुलगा यूपीएससीमध्ये रँक मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. चेतन पंदेरे (Chetan Pandere UPSC) असं या मुलाचं नाव आहे आणि तो रत्नागिरीचा रहिवासी आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनिअरिंग करून चेतनने चार वर्ष सातत्याने मेहनत केली. त्या मेहनतीचं फळ आज त्याला यूपीएससी 2021 च्या अंतिम निकालात रँक (UPSC 2021 Final Result) मध्ये येऊन मिळालं आहे. रँकनुसार चेतनला आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. एका पोलिसाचा मुलगा असल्याने त्याच क्षेत्रातील उच्च पदावर काम करायला मिळत असल्याने पंदेरे कुटुंबीय आनंदात आहे. त्याने त्याचा मार्ग निवडून चांगल्या निकालासाठी प्रसंगी लागेल तेवढी मेहनत केली आणि आज त्याला ते यश मिळालं असं मत चेतन पंदेरेच्या वडिलांनी व्यक्त केलंय.

  • परीक्षा – UPSC 2021
  • नाव – चेतन पंदेरे
  • गाव – रत्नागिरी, महाराष्ट्र
  • UPSC रँक- 416

IPS सेवेत काम करायची संधी मिळेल अशी खात्री – चेतन पंदेरे

चेतन पंदेरे म्हणतो, पोलीस खात्याची आवड मला वडिलांमुळे लागली. 2018 साली मुंबई युनिव्हर्सिटी मधून केमिकल इंजिनिअरिंगमधून पासआऊट झालो. भारत पेट्रोलियममधून नोकरीची ऑफर आली होती पण पोलीस खातं किंवा प्रशासकीय सेवेतच जायचं या हेतूने यूपीएससीची तयारी सुरु केली. गेली चार वर्ष मी प्रयत्न करत आहे आणि आज मला 416 रँक मिळून त्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. रँकिंग प्रमाणे IPS सेवेत मला काम करायची संधी मिळेल अशी मला खात्री आहे. पोलीस खात्यात उच्च पदावर काम करून मी पोलीस खात्याची मान, माझ्या वडिलांची मान उंचावेल.

हे सुद्धा वाचा

‘त्याने ठरवलं आणि करून दाखवलं’

पोलीस खात्याच्या नोकरीमुळे बरेचदा मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. मुलाने मेहनत केली. त्याने त्याचा मार्ग निवडला, आपली प्रगती कशी करायची हे त्याने त्याचं ठरवलं आणि लागेल तितकी मेहनत करून त्याला जे हवंय त्याने ते मिळवलं. ठरवलं आणि करून दाखवलं असं मत चेतन पंदेरेंच्या वडिलांनी यावेळी व्यक्त केलंय. त्याचबरोबर चेतनच्या आईने सुद्धा त्याला जे हवं ते मिळालं म्हणून आनंद व्यक्त केला आणि शुभाशीर्वाद दिले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.