SSC HSC Supplementary Exam: दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! निकाल कसा तपासणार?

यंदा महाराष्ट्र बोर्डाने महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 18 जून रोजी जाहीर केला होता, तर महाराष्ट्र एचएससी निकाल 2022  8 जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

SSC HSC Supplementary Exam: दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! निकाल कसा तपासणार?
10th 12th Supplementary ExamImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 3:38 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. दुपारी एकनंतर निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेत (HSC SSC Supplementary Exam) सहभागी झालेले विद्यार्थी एमएसबीएसएचएसई mahresult.nic.in ऑफिशियल वेबसाइटला (Official Website) भेट देऊन निकाल तपासू शकतात. यंदा महाराष्ट्र बोर्डाने महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 18 जून रोजी जाहीर केला होता, तर महाराष्ट्र एचएससी निकाल 2022  8 जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

उत्तीर्णतेच्या टक्केवारीबद्दल

यापूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 83 हजार 60 इतकी होती. त्याचबरोबर उत्तीर्णतेच्या टक्केवारीबद्दल बोलायचे तर दहावीत 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 94.22 टक्के होती. दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12ऑगस्ट दरम्यान, तर 12 वीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली.

दहावीच्या पुरवणी परीक्षेत 83,127 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, तर 10 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

महाराष्ट्र बोर्ड पुरवणी निकाल कसा तपासायचा?

  • पुरवणी निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होमपेजवर दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आपल्या लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे लॉगिन करा.
  • लॉगइन करण्यासाठी तुम्हाला रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर लागेल, जो तुम्हाला अॅडमिट कार्डवर मिळेल.
  • सर्व तपशील तपासल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्ही तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर तपासू शकाल.
  • निकाल डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या.

गेल्या वर्षी कोरोना व्हायरस महामारीमुळे महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. एका वर्षाच्या अंतरानंतर एमएसबीएसएचएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पेन-पेपर पद्धतीने घेतल्या. यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी १६.३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यात 8,89,506 मुले आणि 7,49,458 मुलींचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.