SSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

SSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 9:21 PM

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ( SSC Result Varsha Gaikwad declared Students who qualified in the Elementary Drawing Exam get additional Marks)

फक्त यावर्षीसाठी सवलत

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.

शासन निर्णय नेमका काय?

राज्यातील कोव्हीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयाच्या वर नमूद क्रमांक (४) येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील कोव्हीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे, तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेची बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा 2020 चे आयोजन न करण्याबाबतचा शासन निर्णय वर नमूद क्रमांक 6 नुसार दिनांक 26 मार्च, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 12 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 28 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) साठी मूल्यमापन करताना शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार दे. असलेल्या अन्य गुणंचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनामुळे इंटरमिजिएट ड्राईंक ग्रेड परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्यानं 2020-2021 यै शैक्षणिक वर्षासाठी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.

संबंधित बातम्या:

कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी

CBSE Board 12th Result 2021: सीबीएसई बारावी निकालासाठी मूल्यांकन फॉर्म्युला उद्या जाहीर होणार

( SSC Result Varsha Gaikwad declared Students who qualified in the Elementary Drawing Exam get additional Marks)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.