AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra SSC Result 2021 | दहावीची परीक्षाच झाली नाही मग निकाल लागला कसा?, समजून घ्या या 4 मुद्द्यांतून

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा झालीच नाही... आज तर निकाल लागला... मग अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की विदयार्थ्यांना नेमके कोणत्या निकषावर गुण दिले गेले...? 

Maharashtra SSC Result 2021 |  दहावीची परीक्षाच झाली नाही मग निकाल लागला कसा?, समजून घ्या या 4 मुद्द्यांतून
दहावी बारावी बोर्ड
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 1:35 PM
Share

Maharashtra SSC Result 2021 | कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा झालीच नाही… आज तर निकाल लागला… मग अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की हा निकाल नेमका कोणत्या आधारावर लावला….. तर या चार मुद्द्यातून समजून घ्या की दहावीचे विद्यार्थी नेमके कसे उत्तीर्ण झाले आणि त्यांना गुण कोणत्या निकषावर गुण दिले गेले…?

  • कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी सन 2021 साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित लेखी परीक्षा रद्द करावी लागल्याने शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची विषय निहाय संपादणूक माध्यमिक शाळा मार्फत निश्चित करण्यात आली. सदर मूल्यमापन वस्तुनिष्ठ होण्यासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठण करुन त्यांना विषय आणि शिक्षक वर्ग शिक्षक यांनी केलेल्या मूल्यमापनाची परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
  • निकाल समितीने अंतिम केलेले गुण मंडळाच्या संगणकीय प्रणाली मार्फत नोंदवून घेण्यात आले. या गुणदानाचे स्वाक्षरीत परिशिष्टे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे जमा करून घेण्यात आलेली आहेत.
  • नियमित व खाजगी विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता पाचवी ते नववी चा अंतिम निकालाची साक्षांकित प्रत विभागीय मंडळाकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर परिशिष्टातील गुणांच्या आधारे रॅन्डम पद्धतीने संगणकीय प्रणालीत भरलेल्या गुणांची पडताळणी करण्यात आली आहे..
  • अशा प्रकारे या वर्षीचा दहावीचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला.

957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के, 9 शाळांचा निकाल शून्य टक्के

दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 12384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.

कोकण अव्वल तर नागपूर तळाशी

कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के लागलेला आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये काही हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

(The 10th exam was not held, so how did the result come out? know this)

हे ही वाचा :

Maharashtra SSC Result 2021 | ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?

Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल जाहीर, ‘इतक्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.