AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Mains Result 2024: यूपीएससीकडून मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर, कुणाच्या प्रयत्नांना आलं यश?

यूपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना आपला निकाल upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर तपासता येईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. तसेच उमेदवारांना 13 ते 19 डिसेंबर दरम्यान मुलाखतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

UPSC Mains Result 2024: यूपीएससीकडून मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर, कुणाच्या प्रयत्नांना आलं यश?
UPSC Mains Result 2024: यूपीएससीकडून मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर
| Updated on: Dec 09, 2024 | 8:54 PM
Share

लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी यूपीएससीच्या upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईट जावून आपला निकाल बघू शकणार आहेत. मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. या मुलाखतीमधून जे उमेदवार पास होतील त्यांचं आयएएस, आयपीएस, आयएफएस यांसह विविध सेवांसाठी सिलेक्शन होईल. यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात आयोजित केली जाते. यामध्ये प्राथमिक परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत यांचा समावेश आहे. यावर्षी यूपीएससीची पहिली परीक्षा 16 जूनला आयोजित करण्यात आली होती. तर मुख्य परीक्षा 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर या तारखांना आयोजित करण्यात आली होती.

UPSC Mains Result 2024: निकाल नेमका कसा पाहावा?

  • सर्वात आधी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • यानंतर होमपेजवरील ‘Whats New’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर UPSC CSE मुख्य निकाल 2024 डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासू शकता.
  • उमेदवारांनी निकालाची एक प्रत जतन करून त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

13 ते 19 डिसेंबर दरम्यान मुलाखतीसाठी अर्ज भरा

यूपीएससीद्वारे यावेळी एकूण 1 हजार पदांसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेत कट-ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा आणि पदांवर भरतीसाठी पात्र असतील. या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना 13 ते 19 डिसेंबर दरम्यान त्यांचा अर्ज (DAF-II) भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.

मार्कशीट कधी प्रसिद्ध होईल?

उमेदवारांच्या मुलाखतीनंतर सर्व उमेदवारांच्या मार्कशीट अंतिम निकाल प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केल्या जातील, जे 30 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी, उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊ शकतात.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.