एक कोटीची नोकरी सोडली अन् IAS ची तयारी, विना कोचिंग पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक, कोण आहे कनिष्क कटारिया
kanishak kataria ias: यूपीएससी परीक्षा 2018 मधील टॉपर कनिष्क कटारिया यांचे कुटुंबच सिव्हील सर्व्हिसमध्ये आहे. त्यांचे वडील आणि काकाही सिव्हील सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे. कनिष्क यांचे वडील सांवरमल वर्मा एक IAS अधिकारी आहे. ते सध्या राजस्थान सरकारमध्ये सामजिक न्याय विभागाचे संचालक आहेत.
upsc success stories: भारतातील नव्हे तर जगातील सर्वात कठीण म्हणून समजली जाणारी परीक्षा संघ लोकसेवा आयोगाची आहे. दरवर्षी IAS आणि IPS होण्याचे स्वप्न लाखो लोक पाहतात. त्यासाठी रात्रंदिवस यूपीएससीची तयारी करतात. परंतु यश शेकडो जणांना येते. त्यामुळे त्यांच्या यशाची यशोगाथा तयार होते. राजस्थानमधील जयपूरमध्ये राहणारे कनिष्क कटारिया यांची यशोकथा अशीच वेगळी आहे. त्यांनी आयआयटी मुंबईतून संगणक शास्त्रात इंजिनिअरींग पूर्ण केले. त्यानंतर त्यांना विदेशात वार्षिक एक कोटी पॅकेज असणारी नोकरी मिळाली. परंतु त्या नोकरीत ते रमले नाही. त्यांनी राजीनामा दिला. भारतात परतले आणि यूपीएससीची तयारी सुरु केली.
’12th फेल’ सारखी कनिष्क कटारियाची स्टोरी
कनिष्क कटारिया यांची यशोगाथा ’12th फेल’ चित्रपटातील मनोज शर्मा प्रमाणे आहे. चित्रपटात मनोज शर्माचा मित्र सांगतो श्रद्धामुळे तुला यश मिळत नाही. तू तिला सोडले, तेव्हाच यश मिळेल. मग श्रद्धाने तिचे प्रेम स्वीकारले. त्यानंतर मनोज शर्माने यूपीएससी क्रॅक केली. तसाच प्रकार कनिष्क कटारिया संदर्भात आहे.
कनिष्काच्या एक कोटीची नोकरी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाला प्रेयसी सोनलने पाठिंबा दिला. नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्याचा जेव्हा कनिष्क यांनी निर्णय घेतला, तेव्हा सोनल यांनी तिला साथ दिली. त्यानंतर कोणतेही कोचिंग न लावता पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. हे केवळ आई, वडील, बहीण आणि प्रेयसीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे झाल्याचे कनिष्क यांनी सांगितले.
वडील अन् काका सिव्हील सर्व्हिसमध्ये
यूपीएससी परीक्षा 2018 मधील टॉपर कनिष्क कटारिया यांचे कुटुंबच सिव्हील सर्व्हिसमध्ये आहे. त्यांचे वडील आणि काकाही सिव्हील सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे. कनिष्क यांचे वडील सांवरमल वर्मा एक IAS अधिकारी आहे. ते सध्या राजस्थान सरकारमध्ये सामजिक न्याय विभागाचे संचालक आहेत. त्यांचे काका के सी वर्मा जयपूरचे विभागीय आयुक्त आहेत. कनिष्क लहाणपणापासून आपले वडील आणि काका यांना वरिष्ठ अधिकारी म्हणून पाहत आले आहे. त्यानंतर आता ते आयएएस झाले. कनिष्क यांनी एका मुलाखतीत सांगितले की, यूपीएससीसाठी त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही. घरातच यूपीएससीची तयारी केली.