TV9-POLSTRAT Exit Poll result 2021 : पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे, बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच!

5 states Exit Poll result 2021 : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसचं कडवं आव्हान, इथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

TV9-POLSTRAT Exit Poll result 2021 : पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे, बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच!
narendra-modi-Mamata-Banerjee_Rahul Gandhi
सचिन पाटील

|

Apr 29, 2021 | 7:28 PM

मुंबई : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांचं मतदान झालं आहे. या राज्यात कोण बाजी मारणार हे येत्या 2 मे रोजी कळेल. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी टीव्ही 9- पोलस्ट्राट ( TV9-POLSTRAT Exit Poll 2021) च्या सर्वात मोठ्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. (5 states assembly elections tv9 POLSTRAT exit poll results 2021 West Bengal Assam Tamil nadu kerla Puducherry vidhan sabha)

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसचं कडवं आव्हान, इथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तामिळनाडूत मोठा उलटफेर होत असून, सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसण्याचे संकेत आहेत. DMK एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. केरळमध्ये सत्ताधारी LDF पुन्हा डाव मांडण्याची चिन्हं, एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसण्याचे संकेत असून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

यानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅटट्रिक करणार असल्याचा अंदाज आहे. ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज टीव्ही 9- पोलस्टारच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जोर लावलेल्या भाजपचा बंगालमधील सत्ता स्थापनेचं स्वप्न हे तूर्तास पूर्ण होणार नाही.

पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा? (West Bengal Exit Poll result)

तृणमूल (TMC) – 142 ते 152 भाजप (BJP) – 125 to 135 डावे + काँग्रेस (LEFT+ Congress) – 16 to 26 अन्य (OTH) – एकूण – 292

—————————————–

आसाममध्ये कुणाची बाजी?

दुसरीकडे आसाममध्ये काट्याची टक्कर असल्याचं दिसतंय. कारण आसाममध्ये टीव्ही 9- पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll 2021) एनडीए आणि यूपीएमध्ये जोरदार फाईट होत आहे. आसाममधील एकूण 126 जागांपैकी भाजपप्रणित NDA ला 59 ते 69, तर काँग्रेसप्रणित UPA ला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी भाजपने संपूर्ण जोर लावला आहे. तर भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी काँग्रेसने आकाशपाताळ एक केलं आहे. या निवडणुकीत सध्या तरी CAA म्हणजे नागरिता दुरुस्ती अधिनियमाचा मुद्दा दिसत नाही. विरोधक सीएएला निवडणुकीचा मुद्दा करण्याच्या प्रयत्नात आहे तर भाजपकडून हा निवडणुकीचा मुद्दाच नसल्याचं सांगून त्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

आसाम एग्झिट पोल (Assam Exit Poll 2021)

NDA – 59 ते 69 UPA – 55 ते 65 अन्य – 1 ते 3 एकूण – 126

पक्षीय बलाबल 2016

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) – 86 आमदार

भाजप – 60 आमदार आसाम गण परिषद – 14 आमदार बोडोलँड पिपल्स फ्रंट – 12 आमदार रभा जातीय ऐक्य मंच – 00 तिवा जातीय ऐक्य मंच – 00

संयुक्त पुरोगामी आघाडी

काँग्रसे – 26 युनायटेड पिपल्स पार्डी (लिबरल) – 00

ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट – 13 आमदार अपक्ष – 01 ———————

केरळमध्ये कुणाची सत्ता? (Kerala Exit Poll 2021)

केरळमध्ये 140 जागांसाठी एका टप्प्यात 6 एप्रिलला मतदान झालं. 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. मात्र त्यापूर्वी केरळमध्ये कुणाची सत्ता येणार याबाबतचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. केरळच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पिनराई विजयन यांनी यशस्वीरित्या सांभाळला. केरळात सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं म्हणजेच (एलडीएफ) चं सरकार आहे.

टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Kerala 2021) केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचं म्हणजेच LDF ला 70 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर UDF ला 59 ते 69 जागा मिळू शकतात. NDA ला 0 ते 2 जागा मिळतील.

केरळमध्ये कुणाला किती जागा? एक्झिट पोल 2021

LDF – 70 ते 80 जागा UDF – 59 ते 69 जागा NDA – 0 ते 2 जागा एकूण – 140

केरळमधील पक्षीय बलाबल (2016)

CPI (M) -58 काँग्रेस -22 CPI – 19 IML – 18 IND-06 BJP-01 इतर – 16 एकूण जागा- 140 ———————–

तामिळनाडूमध्ये कोणाचं सरकार

माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव, सुपरस्टार रजनीकात यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसन आणि शशिकला यांची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार झाली. तामिळनाडूतील राजकारणात एक हाती सत्ता आणणारा किंवा जनतेचं मोठं वलंय असलेला एक तरी नेता सध्या नाही, त्यामुळे तामिळनाडूत काय होईल यावर भाष्य करणं राजकीय पंडितांना कठीण झालं.

तामिळनाडूत 234 जागांसाठी एक टप्प्यात मतदान 6 एप्रिल रोजी मतदान झालं असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.

तामिळनाडू एक्झिट पोल (Tamil Nadu Exit Poll 2021)

टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Tamil Nadu 2021) तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी AIDMK ला विरोधी पक्ष द्रमुक अर्थात DMK ने मोठा झटका दिल्याचं चित्र आहे. कारण सत्ताधारी AIDMK ला केवळ 75 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर DMK ने मोठी मजल मारत 143 ते 153 जागा काबिज करण्याचा अंदाज आहे.

तामिळनाडूत कुणाला किती जागा?

डीएमके (DMK) – 143 ते 153 एआयडीएमके (AIDMK) – 75 ते 85 अन्य – 02 ते 12 एकूण – 234 —————–

पुद्दुचेरीत कोणाची बाजी? (Puducherry Exit poll)

पुद्दुचेरी विधानसभेत एकूण 30 जागांसाठी मतदान झालं. राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका झाल्या. आमदारांनी बंड केल्याने सत्ता सोडावी लागलेल्या काँग्रेसला मतदार पुन्हा सत्तेत येण्याची संधी देणार की पुन्हा राज्यात खिचडी सरकार येणार हे येत्या 2 मे रोजी स्पष्ट होईल. पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान झालं. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.

टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Puducherry 2021) भाजपप्रणित NDA ला 17 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला 11 ते 13 जागा मिळतील अशी शक्यता आहे.

एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा

भाजपप्रणित NDA – 17 ते 19 जागा काँग्रेसप्रणित UPA – 11 ते 13 जागा एकूण – 30 जागा

2016 नुसार पुद्दुचेरी विधानसभेत कोणत्या पक्षाचे किती आमदार? काँग्रेस – 10, DMK-3 ऑल इंडिया एन आर काँग्रेस – 7 AIDMK- 4 भाजप – 3 अपक्ष – 1

संबंधित बातम्या 

Exit Poll Results 2021 LIVE : पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकड्यांकडे देशाचं लक्ष

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें