Exit Poll Results 2021 LIVE : पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकडे समोर

5 States elections’ exit Poll Results 2021 LIVE: टीव्ही 9 मराठीवर सर्वच एक्झिट पोल्सचे निकाल एकाच ठिकाणी पहायला मिळतील

Exit Poll Results 2021 LIVE : पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकडे समोर
नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी

| Edited By: अक्षय चोरगे

Apr 29, 2021 | 8:12 PM

Exit Poll Results 2021 : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज (29 एप्रिल) संपली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत मतदान झालं. त्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यानुसार पाच पैकी दोन राज्यात भाजप पुढे आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅटट्रिक करत असल्याचं दिसतंय.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election) आठव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होताच सर्व वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल (Exit Poll Results 2021) दिसू लागले. परंतु सर्वात वेगवान आणि अचूक एक्झिट पोल केवळ ‘टीव्ही 9 मराठी’वर  पाहायला मिळाले.  सायंकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमधील 35 जागांवर आठव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. (5 states assembly elections tv9 exit poll results)

टीव्ही 9- पोलस्ट्राट एक्झिट पोल ( TV9-POLSTRAT Exit Poll 2021)

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसचं कडवं आव्हान, इथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तामिळनाडूत मोठा उलटफेर होत असून, सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसण्याचे संकेत आहेत. DMK एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. केरळमध्ये सत्ताधारी LDF पुन्हा डाव मांडण्याची चिन्हं, एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसण्याचे संकेत असून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा? (West Bengal Exit Poll result)

तृणमूल (TMC) – 142 ते 152 भाजप (BJP) – 125 to 135 डावे + काँग्रेस (LEFT+ Congress) – 16 to 26 अन्य (OTH) – एकूण – 292

आसाम एग्झिट पोल (Assam Exit Poll 2021)

NDA – 59 ते 69 UPA – 55 ते 65 अन्य – 1 ते 3 एकूण – 126

केरळमध्ये कुणाला किती जागा?   LDF – 70 ते 80 जागा UDF – 59 ते 69 जागा NDA – 0 ते 2 जागा एकूण – 140

तामिळनाडूत कुणाला किती जागा?

डीएमके (DMK) – 143 ते 153 एआयडीएमके (AIDMK) – 75 ते 85 अन्य – 02 ते 12 एकूण – 234

एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा

भाजपप्रणित NDA – 17 ते 19 जागा काँग्रेसप्रणित UPA – 11 ते 13 जागा एकूण – 30 जागा

Exit Poll west Bengal

Exit Poll west Bengal

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Apr 2021 07:18 PM (IST)

  TV9-POLSTRAT Exit Poll result Assam : आसाममध्ये काट्याची टक्कर

  आसाममध्ये काट्याची टक्कर असल्याचं दिसतंय. कारण आसाममध्ये टीव्ही 9- पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll 2021) एनडीए आणि यूपीएमध्ये जोरदार फाईट होत आहे. आसाममधील एकूण 126 जागांपैकी भाजपप्रणित NDA ला 59 ते 69, तर काँग्रेसप्रणित UPA ला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 • 29 Apr 2021 07:11 PM (IST)

  ABP exit poll West Bengal : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल वरचढ

  एबीपीच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस वरचढ, ममता बॅनर्जी हॅटट्रिक करण्याची चिन्हं

  पाश्चिम बंगाल टीएमसी – 152 – 164 भाजपा – 109 – 121 काँग्रेस – 14 – 25

 • 29 Apr 2021 07:09 PM (IST)

  Times Now exit poll West Bengal : टाईम्सच्या पोलमध्ये तृणमूलला कौल

  टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस वरचढ, ममता बॅनर्जी हॅटट्रिक करण्याची चिन्हं

  पश्चिम बंगाल टीएमसी - 128 - 138 भाजपा - 138 - 148 डावे - 11 - 21

 • 29 Apr 2021 07:05 PM (IST)

  Republic exit poll : 1 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये भाजप वरचढ

  दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये भाजप वरचढ, रिपब्लिक भारतचा एक्झिट पोल

  Republic exit poll

  तृणमूल - 128-138

  भाजप - 138-148

  डावे+ काँग्रेस - 11-21

 • 29 Apr 2021 06:46 PM (IST)

  5 states exit poll live : थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे समोर येणार

  थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे समोर येतील. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत मतदान झालं. त्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. संध्याकाळी 7 वाजता एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात होईल.

 • 29 Apr 2021 06:26 PM (IST)

  West Bengal Exit Poll Live : पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार?

  पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

 • 29 Apr 2021 06:26 PM (IST)

  Assam Exit Poll Live आसाममध्ये सरकार कुणाचं येणार?

  आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 27 मार्च, दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी झालं. 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

 • 29 Apr 2021 06:25 PM (IST)

  Tamil Nadu Exit Poll Live : तामिळनाडूत कोण बाजी मारणार?

  तामिळनाडूत 234 जागांसाठी एक टप्प्यात मतदान झालं. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान पार पडलं असून, 2 मे रोजी निकाल लागणार आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. राज्यात एआयडीएमकेची सत्ता आहे. पलानीस्वामी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत एमआयएडीएमकेच्या आघाडीने 134 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी डीएमके दुसऱ्या क्रमांकावर गेली होती. डीएमकेला 98 जागा मिळाल्या होत्या.

 • 29 Apr 2021 06:25 PM (IST)

  Kerala Exit Poll Live : केरळमध्ये एका टप्प्यात मतदान

  केरळमध्ये 140 जागांसाठी एका टप्प्यात मतदान झालं. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान पार पडलं असून, 2 मे रोजी निकाल लागणार आहे. केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 71 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2016 च्या निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता तर यूडीएफने 47 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे भाजपची मात्र पुरती धुळधाण झाली होती. 98 जागांपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला होता.

 • 29 Apr 2021 06:24 PM (IST)

  Puducherry Exit Poll Live : पुद्दुचेरीमध्ये कुणाचा गुलाल?

  पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान झालं असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. पुद्दुचेरी विधानसभेत एकूण 30 जागांसाठी मतदान झालं. राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका झाल्या. आमदारांनी बंड केल्याने सत्ता सोडावी लागलेल्या काँग्रेसला मतदार पुन्हा सत्तेत येण्याची संधी देणार की पुन्हा राज्यात खिचडी सरकार येणार हे येत्या 2 मे रोजी स्पष्ट होईल. पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान झालं. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.

Published On - Apr 29,2021 7:18 PM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें