
Congress worst performance: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025 (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आणि काँग्रेसच्या अस्तित्वावर पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले. काँग्रेसने या निवडणुकीत 61 जागा लढवल्या. त्यातील केवळ 5 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. आतापर्यंतचे काँग्रेसची ही सर्वात सुमार कामगिरी ठरली. बिहारमध्येच नाही तर यापूर्वी सुद्धा पराभवाची ही मालिका अखंडीत पणे सुरूच आहे. त्यामुळे राहुल गांधी पराभवाची मालिका खंडीत करतील की नाही असा सवाल विचारला जात आहे. सत्ताधारी त्यांना कोणत्याही नावाने हिणवत असले तरी तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये त्यांच्याविषयी ओढ दिसते. पण त्यांना गर्दीचे परिवर्तन मतात करता येत नसल्याचे दिसून आले आहे.
पराभवाच्या शतकाची वाट पाहणार का?
बिहारच्या पराभवाने काँग्रेसची शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या 20 वर्षांत काँग्रेसला आतापर्यंत 95 ठिकाणी पराभवाला सामना करावा लागला. देशातील जवळपास प्रत्येक निवडणुकीत काही अपवाद वगळता काँग्रेसला फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यात काँग्रेसचा जनाधार हरवत चालल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी जुने जाणते नेते पक्षाला सोडून गेले आहेत. अनेक ठिकाणी संघटनात्मक दरी वाढली आहे. अनेक ठिकाणी नेतृत्वाचे संकट उभे ठाकले आहे. या वैभवशाली पक्षाला संजीवनीची आणि एका हनुमानाची अत्यंत गरज असल्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने देशभरातील जवळपास मोठ्या राज्यात काँग्रेसला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. लोकसभाच नाही तर विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीतही अनेक ठिकाणी पक्षाला नवसंजीवनीची गरज आहे. उत्तर प्रदेशापासून ते गुजरातपर्यंत पराभवाची लांबलचक यादी आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकासारख्या राज्यात त्यांना धक्के बसले आहेत. उत्तर-पूर्व राज्य हे काँग्रेसचे गड मानण्यात येत होते. पण आता या राज्यात काँग्रेस निदान औषधाला तरी सापडेल की नाही अशी स्थिती उद्भवली आहे. 2018 पासून मध्य भारतातून काँग्रेस बाहेर फेकल्या जात आहे. ही घसरण अत्यंत वेगाने होत आहे. बिहारच्या निवडणुकीत गेल्यावेळी काँग्रेसकडे 19 आमदार होते. ही संख्या आता 5 वर येऊन ठेपली आहे.
सर्वाधिक पराभव कुठे?
या राज्यात सर्वाधिक वेळा पराभवाचा सामना
१. उत्तर प्रदेशात राहुल गांधींना सर्वाधिक वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले. वर्ष 2007, 2012, 2017, 2022 आणि आता 2025, सलग पाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आलेख घसरला आहे.
२. बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रत्येक निवडणुकीनंतर घसरत आहे. 2005, 2010, 2020 आणि आता 2025 मध्ये काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे मिळवलेला विजय सुद्धा संघर्षातून आला आहे.
३. गुजरात राज्यात वर्ष 2007, 2012, 2017, 2022 या चार निवडणुकीत काँग्रेसला गड राखताना मोठी कसरत करावी लागली. पंतप्रधानांच्या किल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न अजून ही यशस्वी झालेला नाही. गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेसाठी दुसरा पर्याय ठरली नाही.
४. मध्य प्रदेश / राजस्थान / छत्तीसगडमध्ये वर्ष 2008, 2013, 2018, 2023 येथील पराभवानंतर काँग्रेसला त्यांचे संघटनही टिकवता आलेले नाही. अनेक नेत्यांना काँग्रेसकडे पाठ फिरवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
५. उत्तर-पूर्वेतील मिझोरम, मणिपुर, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशात 2018–2024 या काळात काँग्रेसला जवळपास नाकारण्यात आले आहे. हा भाग जणू काँग्रेसने गमावला आहे. गेल्या 20 वर्षांत काँग्रेसने जवळपास 95 निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना केला आहे.