Goa Assembly Elections 2022 : गोव्यात सासऱ्याला सूनेचं आव्हान, मंत्री असलेल्या मुलाची कोंडी; नंतर काय घडलं?

Goa Assembly Elections 2022 : गोव्यात सासऱ्याला सूनेचं आव्हान, मंत्री असलेल्या मुलाची कोंडी; नंतर काय घडलं?
Goa Assembly Elections 2022 : Pratapsingh Rane withdraws from fray after BJP fields his daughter-in-law from same seat

गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. अनेक उमेदवारांनी तिकीट मिळावं म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 28, 2022 | 1:54 PM

पणजी: गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. अनेक उमेदवारांनी तिकीट मिळावं म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी आपल्या कुटुंबांतील सदस्यांना तिकीट मिळावं म्हणूनही सेटिंग लावली होती. त्यातील काहींना तिकीट मिळालं, तर काहींना तिकीट मिळू शकलं नाही. त्यामुळे तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी थेट बंडखोर उमेदवार म्हणून मैदानात शड्डू ठोकला आहे. गोव्यात तर एका सूनेने थेट सासऱ्यालाच आव्हान दिलं आहे. सुनेने सासऱ्या विरोधात निवडणूक अर्ज भरल्याने मंत्री असलेल्या मुलाची चांगलीच कोंडी झाली. बायकोची बाजू घ्यावी की वडिलांचा प्रचार करावा अशा पेचात हा मुलगा अडकला. त्यामुळे आता काय होणार? असा प्रश्न गोवेकरांना पडलेला असतानाच कहाणीत ट्विटस्ट आला. बरीच राजकीय सूत्रं फिरली. मनधरणी, समजावणे झालं. त्यानंतर अखेर सासऱ्यांने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे बायको आणि बापाच्या कात्रीत सापडलेल्या मुलाची अखेर सुटका झाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे परये विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. भाजपने याच मतदारसंघातून त्यांची सून आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली. प्रतापसिंह राणे यांनी दोन दिवसांपूर्वी स्थानिक मंदिरात देवदर्शन घेत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. प्रतापसिंह राणे यांच्या संकेतामुळे त्यांचे चिरंजीव, मंत्री विश्वजीत राणे आणि भाजपची कोंडी झाली होती.

अन् निवडणूक टळली

त्यानंतर प्रतापसिंह राणे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले. त्यात काही नेत्यांना यश मिळाले. त्यामुळे अखेर राणे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे विश्वजीत राणे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक लढवली असती तर गोव्याच्या इतिहासात प्रथमच एकाच मतदार संघात सासरा विरुद्ध सून अशी लढत झाली असती. राणे यांनी माघार घेतल्याने ही लढत आता टळली आहे.

सहावेळा मुख्यमंत्री, 50 वर्ष आमदार

प्रतापसिंह राणे यांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राज्यात सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवले आहे. 1980 ते 1985, 1985 ते 1989, 1990 मध्ये तीन महिने, 1994 ते 1999, 2005 साली महिनाभर, 2005 ते 2007 प्रतापसिंह राणे गोव्याचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे ते सलग 50 वर्षे आमदार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा अवघा एक दिवस उरला असताना राणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. राणे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसने परये मतदार संघात पक्षाचा उमेदवार बदलला आहे. आता या मतदारसंघातून काँग्रेसकडून रणजित राणे निवडणूक लढणार आहेत.

फडणवीस-राणे भेट

भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच प्रतापसिंह राणे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र प्रतापसिंह राणे यांनी ही भेट राजकीय नव्हती असा खुलासा केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने प्रतापसिंह राणे यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची दखल घेत त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला आहे.

संबंधित बातम्या:

Goa Assembly Elections 2022 : भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार? वाचा एका क्लिकवर

Goa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रीकरांवरून राऊतांनी पुन्हा डिवचले, फडणवीस समजूत काढण्यात पटाईत आहेत पण…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें