होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक; ममतादीदींची डरकाळी

नंदीग्रामच्या मैदानातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डरकाळी फोडली आहे. (i am Royal Bengal Tiger, cannot be intimidated by BJP, says Mamata Banerjee )

होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक; ममतादीदींची डरकाळी
Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:54 PM

नंदीग्राम: नंदीग्रामच्या मैदानातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डरकाळी फोडली आहे. होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर आहे. मेलेल्या वाघापेक्षा जखमी वाघ नेहमीच खतरनाक असतो, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले आहेत. (i am Royal Bengal Tiger, cannot be intimidated by BJP, says Mamata Banerjee )

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघातून स्वत: ममता बॅनर्जी निवडणूल लढवत आहेत. आज त्यांनी नंदीग्राममध्ये व्हीलचेअरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपलाच थेट ललकारले. ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत. अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार असून त्यांचे नंदीग्रामवर प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांना मार लागला होता. त्यांच्या पायाला लागलं होतं. त्यामुळे त्या सध्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. आजही त्या व्हीलचेअरवर बसूनच नंदीग्राममध्ये आल्या. रणरणत्या उन्हातही त्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे.

यूपी, बिहारचे गुंड आले

येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे विधान केलं. माझ्या पायाला मार लागलेला आहे. तरीही मी सभेला संबोधित करत आहे. हे सर्व त्यांच्या (शुभेंदू अधिकारी) इशाऱ्यावर होत आहे. डिवचलं तर मी सोडत नाही. मी रॉयल बेंगॉल टायगर आहे. मेलेला वाघ हा जखमी वाघांपेक्षा अधिक खतरनाक असतो. मी बंगालमध्ये कोणत्याही मतदारसंघात उभे राहिले असते तर निवडून आले असते. मात्र, इतिहास घडवण्यासाठी मी नंदीग्राममध्ये उभी आहे. पुढचा मुख्यमंत्री हा नंदीग्राममधलाच असेल. नंदीग्राममध्ये घुसखोरी करणाऱ्या गुंडांपासून तो नंदीग्रामचं संरक्षण करेल. त्यामुळे बंगाल वाचवा, बंगालच्या अस्तित्वाचं रक्षण करा, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं.

तुम्ही तयार राहा

गुंडांच्या माध्यमातून नंदीग्राममध्ये बुथ लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाहेरच्या गुंडांना राज्यात बोलावलं गेलं आहे. त्यांची हॉटेलात बडदास्त ठेवण्यात आली आहे. तुम्ही बुथ लुटूनच पाहा तुमची काय हालत होते ते दिसेल. यांना दंगल घडवायची आहे. त्यामुळे मी आयाबहिणींना सांगते, हे लोक दंगल भडकवण्यासाठी आले तर तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी केलं.

यूपी, बिहारचे पोलीस नको

दरम्यान, नंदीग्राममध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील पोलीस तैनात करू नका, अशी मागणी टीएमसीने निवडणूक आयोगाला केली आहे. त्याबाबत टीएमसीने निवडणूक आयोगाला एक अर्ज दिला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातून गुंड आणले असून त्यांनी नंदीग्रामच्या विविध हॉटेलात लपवून ठेवले आहे, असा आरोपही या निवेदनात केला आहे.

रणरणत्या उन्हात रोड शो

पश्चिम बंगालमध्ये उन्हाचा पारा चढला आहे. कडाक्याचं ऊन पडल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तरीही या रणरणत्या उन्हात ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून रोडशोला सुरुवात केली आहे. प्रचंड ऊन असल्याने ऊन्हापासून वाचण्यासाठी त्यांनी डोक्याला एक पांढरा कपडा गुंडाळला आहे. तर मतदारांनीही या रोडशोला प्रचंड प्रतिसाद दिला असून रोडशोमध्ये तुफान गर्दी झाली आहे. दुसरीकडे भाजपचे नेते बाबुल सुप्रियो हे आज टॉलीगंज येथे निवडणूक प्रचार करणार आहेत. तर, उद्या 30 मार्च रोजी भाजप नेते अमित शहा उद्या नंदीग्राममध्ये येऊन ममता बॅनर्जींना आव्हान देणार आहेत. त्यामुळे उद्या शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (i am Royal Bengal Tiger, cannot be intimidated by BJP, says Mamata Banerjee )

30 जागांवर मतदान

पश्चिम बंगालमध्ये 30 जागांवर येत्या 1 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचाही समावेश आहे. तर, 30 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, अमित शहा यांच्यासह शुभेंद्रू अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी झोकून देऊन प्रचार सुरू केला आहे. (i am Royal Bengal Tiger, cannot be intimidated by BJP, says Mamata Banerjee )

संबंधित बातम्या:

429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

बंगालच्या राजकारणात ‘ऑडिओ क्लिप वॉर’; भाजपनंतर टीएमसीकडून क्लिप जारी

(i am Royal Bengal Tiger, cannot be intimidated by BJP, says Mamata Banerjee )

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.