AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karnataka Election Exit poll results 2023 | कर्नाटकात एक्झिट पोलमध्ये भाजपाला धक्का, काँग्रेसकडे भाजपापेक्षा किती जास्त?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीत भाजपला जोरदार झटका मिळताना दिसत आहे. कारण काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे.

Karnataka Election Exit poll results 2023 |  कर्नाटकात एक्झिट पोलमध्ये भाजपाला धक्का, काँग्रेसकडे भाजपापेक्षा किती जास्त?
Karnataka Poll scheduleImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 10, 2023 | 7:35 PM
Share

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडलं आहे. या निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात 224 जागांसाठीचं मतदान पार पडलं. त्यानंतर आता येत्या 13 मे ला मतमोजणी केली जाणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेची आकडेवारी आता समोर येत आहे. TV9 भारतवर्ष-POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडून येण्याची शक्यता आहे. पण तरीही बहुमतापासून काही अंतर लांब असणार आहे. कुणालाच बहुमत मिळणार नाही, अशी आकडेवारी सध्या समोर येताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटकात नेमकी कुणाची सत्ता येणार याबाबत आत्ताच अंदाज बांधणं कठीण आहे.

TV9 भारतवर्ष-POLSTRAT एक्झिट पोलचे नेमके आकडे काय?

काँग्रेस – 99-109 भाजप – 88-98 जेडीएस- 21-26 इतर – 0-4

TV9 कन्नड-सी वोटरच्या एक्झिट पोलची आकडेवारी :

काँग्रेस – 100-112 भाजप – 83-95 जेडीएस- 21-29 इतर – 02-06

मध्य कर्नाटकमध्ये काँग्रेस वाढण्याची शक्यता

आजतक-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य कर्नाटकात काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मध्य कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 23 जागा आहेत. यापैकी 12 जागांवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर भाजपला 10 जागांवर समाधान मानावं लागेल, असं दिसतंय. याशिवाय एक अपक्ष येथून निवडून येण्याची शक्यता आहे.

भाजप या भागांमध्ये वाढण्याची शक्यता

TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलनुसार, सीमा भागासह अन्य मतदारसंघांत भाजप मुसंडी मारण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 3 ते 5 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.

हैदराबाद कर्नाटक भागात काँग्रेसला 18 ते 20 जागा मिळणार?

TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, कल्याण कर्नाटक किंवा हैदराबाद कर्नाटक भागात काँग्रेसला 18 ते 20 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 8 ते 12 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच जेडीएसला 1 आणि इतरांना 3 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

ओल्ड मैसूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार

TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकच्या ओल्ड मैसूर येथील 55 जागांपैकी तब्बल 25 ते 27 जागांवर काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 6 ते 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जेडीएसला 18 ते 20 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तसेच अपक्षांना या भागात दोन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, ओल्ड मैसूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

ग्रेटर बंगळुरुत काँटे की टक्कर

TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, बंगळुरुत काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर असणार आहे. ग्रेटर बंगळुरु भागात 32 जागांपैकी 15 ते 17 जागांवर भाजपला यश मिळण्याची शक्यात आहे. तर काँग्रेसला 13 ते 15 जागांवर काँग्रेसला यश मिळेल असा अंदाड आहे. तसेच जेडीएसला 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई कर्नाटक भागातही भाजप-काँग्रेसमध्ये चुरस

TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मुंबई कर्नाटक भागातही भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असणार आहे. मुंबई कर्नाटकातील 50 जागांपैकी 24 ते 27 जागांवर भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 23 ते 26 जागांवर यश मिळू शकचं. तर जेडीएसला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?