गोरखपूर लोकसभा निकाल 2024 : गोरखपूरमध्ये योगींची अग्नीपरीक्षा, रवी किशन मारतील बाजी?

Gorakhpur Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : गोरखपूर हा उत्तर प्रदेशचा जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये कोणाचा विजय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गोरखपूर लोकसभा निकाल 2024 :  गोरखपूरमध्ये योगींची अग्नीपरीक्षा, रवी किशन मारतील बाजी?
| Edited By: | Updated on: Jun 04, 2024 | 12:41 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये विजय मिळवणे म्हणजे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भाजपने अभिनेते रवी किशन शुक्ला (Ravi Kishan) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदार संघात कोण बाजी मारणार? पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोरखपूर हा उत्तर प्रदेशचा जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ आहे. राप्ती आणि रोहानी नद्यांच्या काठावर वसलेल्या गोरखपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3 हजार 321 चौरस किलोमीटर आहे. (Gorakhpur lok sabha election 2024 )

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर गोरखपूरची 70.83 टक्के लोकसंख्या साक्षर आहे. यामध्ये पुरुषांच्या साक्षरतेचं प्रमाण 81.80 टक्के तर महिलांचे साक्षरतेचे प्रमाण 59.36 टक्के आहे. गोरखपूर लोकसभा जागेवर अंदाजे 19.5 लाख मतदार आहेत, ज्यामध्ये निषाद, मल्लाह आणि बिंद जातीच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1998 ते 2017 पर्यंत सलग 5 वेळा गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. गोरखपूर जिल्ह्यात गोरखपूर आणि बांसगाव असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.

2019 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भाजप अभिनेता रवी किशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना 7,17,122 मते मिळाली. तर सपाचे राम निषाद यांना 4,15,458 मते मिळाली होतीआणि काँग्रेसचे मधुसूदन त्रिपाठी यांना फक्त 22,972 मते मिळाली.

2019 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2014)

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून विजयी झाले होते, त्यांना 5,39,127 मते मिळाली होती. तर सपाच्या राजमती निषाद यांना 2,26,344 आणि बसपाचे राम भुवल निषाद यांना 1,76,412 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष मागे पडला होता.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर