मध्यावधीला तयार राहा, मोदी सरकार वर्षभरात कोसळणार… बड्या नेत्याची भविष्यवाणी

नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदेतील नेता म्हणून एकमताने काल निवड झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मोदी यांना सरकार स्थापनेसाठी शपथग्रहण करण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच नवे सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

मध्यावधीला तयार राहा, मोदी सरकार वर्षभरात कोसळणार... बड्या नेत्याची भविष्यवाणी
narendra modi
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 08, 2024 | 4:05 PM

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात मोदी सरकारला एकट्याच्या बळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजपाला एकट्याच्या बळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपाला एकट्याला केवळ 240 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे एनडीएचे घटकपक्ष नितीश कुमार आणि आंध्रचे चंद्राबाबूंच्या टेकूवर हे सरकार स्थापन होण्यापूर्वीच त्याच्या विश्वासाहर्यतेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश नेहमीच भाजपाच्या पाठीशी उभा राहीला आहे. परंतू यंदा युपीत भाजपाला 32 जागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपाला हा बहुमतांपासून दूर राहीले आहे. त्यामुळे आता नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या मागण्यावाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भूपेश बघेल यांनी हे सरकार फार तर वर्षभर टिकेल अशी भविष्यवाणी केली आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लोकसभा निवडणूक निकालांवर भाष्य केले आहे. जी लोकं मुख्यमंत्र्यांनी तुरुंगात टाकत आहेत. पक्ष फोडत आहेत. त्यांना जनतेने चांगली अद्दल घडविली आहे. मोदी सरकारच्या मागील कारभारावर देखील भूपेश बघेल यांनी जोरदार टिका केली आहे.

मध्यावती निवडणूकांची तयारी करा

छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना भूपेश बघेल म्हणाले की जरी एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी सरकारला आता पाठिंबा दिला आहे. तरी कोणत्याही क्षणी हे सरकार पडू शकते. त्यामुळे कोणत्याही क्षणाला मध्यावती निवडणूका होऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी तयार राहावे असे भूपेश बघेल म्हणाले. देशात येत्या 6 महिन्यात किंवा एक वर्षभरात केव्हाही लोकसभा निवडणूका होऊ शकतात. महाराष्ट्रात भाजपाचे नेते जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जागा कमी झाल्याने आपोआप योगी यांचे सत्ताआसन डळमळीत झाले आहे. भजनलाल शर्मा यांची देखील राजस्थानात स्थिती खराब झाली आहे असेही कॉंग्रेस नेते भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.

सरकार स्थापन होण्याआधीच जेडीयूच्या मागण्या

कॉंग्रेस नेते भूपेश बघेल यांना एनडीएच्या सरकारच्या स्थिरतेवर प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की अजून सरकारची विधीवत स्थापना देखील झालेली नाही आणि जेडीयूचे नेते अग्निवीर आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत. जे खरेतर राहुल गांधी यांनी आपल्या निवडणूक प्रचारात वापरले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदेतील नेता म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी शपथग्रहण करण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच तोपर्यंत ते काळजीवाहू म्हणून हे पद सांभाळणार आहेत.