West Bengal Election 2021: रणरणत्या उन्हात व्हीलचेअरवरून ममता बॅनर्जींचा प्रचार; नंदीग्राममध्ये रोडशो

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकाची प्रचार शिगेला पोहोचला आहे. (Mamata Banerjee conducts massive roadshow in Nandigram)

West Bengal Election 2021: रणरणत्या उन्हात व्हीलचेअरवरून ममता बॅनर्जींचा प्रचार; नंदीग्राममध्ये रोडशो
Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 1:05 PM

नंदीग्राम: पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकाची प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या रणरणत्या उन्हात व्हीलचेअरवरून प्रचारासाठी मैदानात उतरल्या असून त्यांच्या रोडशोला सुरुवात झाली आहे. (Mamata Banerjee conducts massive roadshow in Nandigram)

ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत. अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार असून त्यांचे नंदीग्रामवर प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांना मार लागला होता. त्यांच्या पायाला लागलं होतं. त्यामुळे त्या सध्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. आजही त्या व्हीलचेअरवर बसूनच नंदीग्राममध्ये आल्या. रणरणत्या उन्हातही त्यांनी मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे.

रोड शो आणि जनसभा

ममता बॅनर्जी आज नंदीग्राममध्ये रोड शो करणार आहेत. 8 किलोमीटरचा हा रोड शो आहे. खुदीराम मोड येथून हा रोड शो सुरू होणार असून ठाकूर चौकात त्याचं सभेत रुपांतर होणार आहे. मात्र, रोड शो सुरू झाल्यानंतर ठरवलेल्या मार्गावरून न जाता ममता बॅनर्जी यांनी गावांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ठरलेला मार्ग बदलल्याचं सूत्रांनी सांगितलं. दुपारी 1.30 वाजता ठाकूर चौकात ममता बॅनर्जी यांची जनसभा होणार आहे. त्यानंतर 2 वाजता बोयल द्वितीय येथे त्यांची सभा होईल. त्यानंतर 3.30 वाजता नंदीग्रामच्या अहमदाबाद हायस्कूल मैदानावर त्या जनसभेला संबोधित करणार आहेत. या ठिकाणी त्या अधिकवेळ देणार आहेत.

रणरणत्या उन्हात रोड शो

पश्चिम बंगालमध्ये उन्हाचा पारा चढला आहे. कडाक्याचं ऊन पडल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तरीही या रणरणत्या उन्हात ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून रोडशोला सुरुवात केली आहे. प्रचंड ऊन असल्याने ऊन्हापासून वाचण्यासाठी त्यांनी डोक्याला एक पांढरा कपडा गुंडाळला आहे. तर मतदारांनीही या रोडशोला प्रचंड प्रतिसाद दिला असून रोडशोमध्ये तुफान गर्दी झाली आहे. दुसरीकडे भाजपचे नेते बाबुल सुप्रियो हे आज टॉलीगंज येथे निवडणूक प्रचार करणार आहेत. तर, उद्या 30 मार्च रोजी भाजप नेते अमित शहा उद्या नंदीग्राममध्ये येऊन ममता बॅनर्जींना आव्हान देणार आहेत. त्यामुळे उद्या शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

30 जागांवर मतदान

पश्चिम बंगालमध्ये 30 जागांवर येत्या 1 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचाही समावेश आहे. तर, 30 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, अमित शहा यांच्यासह शुभेंद्रू अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी झोकून देऊन प्रचार सुरू केला आहे. (Mamata Banerjee conducts massive roadshow in Nandigram)

संबंधित बातम्या:

429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

बंगालच्या राजकारणात ‘ऑडिओ क्लिप वॉर’; भाजपनंतर टीएमसीकडून क्लिप जारी

(Mamata Banerjee conducts massive roadshow in Nandigram)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.