AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हद्द झाली! डीएमके सत्तेत आल्याने महिलेने जीभ कापून नवस फेडला; रुग्णालयात दाखल

आपली निष्ठा असलेल्या पक्षासाठी आणि नेत्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. (DMK Supporter Cuts off Part of Her Tongue to Fulfill Vow After DMK Victory )

हद्द झाली! डीएमके सत्तेत आल्याने महिलेने जीभ कापून नवस फेडला; रुग्णालयात दाखल
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन
| Updated on: May 03, 2021 | 3:06 PM
Share

चेन्नई: आपली निष्ठा असलेल्या पक्षासाठी आणि नेत्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. रामनाथपूरम जिल्ह्यात एका डीएमके समर्थक महिलेने डीएमकेला अभूतपूर्व यश मिळाल्याने मंदिराबाहेर जीभ कापली आहे. डीएमकेची सत्ता येण्यासाठी या महिलेने नवस केला होता. तो फेडण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (DMK Supporter Cuts off Part of Her Tongue to Fulfill Vow After DMK Victory )

वनिथा असं या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला परमाकुडी येथे राहते. तिच्या नवऱ्याचं नाव कार्तिक आहे. डीएमकेला बहुमत मिळाल्यानंतर आज सकाळी ही महिला मंदिरात गेली. तिला मंदिरात देवाच्या प्रतिमेसमोर जीभ कापून नवस फेडायचा होता. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तामिळनाडूत कडक निर्बंध लागू आहेत. मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये जाण्यासही मज्जाव करण्यात येत आहे. वनिथा मंदिराजवळ गेली तेव्हा मंदिराचा गेट बंद असलेला दिसला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नवस फेडायचा असल्याने तिने मंदिराच्या गेटवर उभं राहूनच जीभ कापली. त्यामुळे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याने ती मंदिराबाहेरच बेशुद्ध होऊन पडली.

प्रकृती स्थिर

वनिथाला रक्तबंबाळ अवस्थेत काही लोकांनी पाहिले. त्यामुळे या लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. तामिळनाडूत राजकीय नेते आणि सेलिब्रिटींवर येथी लोक वेड्या सारखं प्रेम करतात. आपल्या नेत्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंडन करून फिरत असतात. विशेष करून तामिळनाडूतील लोक डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच प्रमुख पक्षांवर सर्वाधिक प्रेम करतात. 5 डिसेंबर 2016 रोजी एआयएडीएमकेच्या नेत्या जयललिता यांचं निधन झालं होतं. या धक्क्याने 30 लोकांनी प्राण सोडले होते.

तामिळनाडूमध्ये सत्ताबदल

तामिळनाडू विधानसभेत मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी एआयडीएमके ला मोठा झटका बसला आहे. डीएमकेने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. डीएमकेने यापैकी 133 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी एआयडीएमकेला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल 2021

डीएमके – 133 एआयडीएमके – 66 काँग्रेस – 18 भाजप – 4 अन्य – 13 एकूण – 234  (DMK Supporter Cuts off Part of Her Tongue to Fulfill Vow After DMK Victory )

संबंधित बातम्या:

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी   

West Bengal Election Results 2021: ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये पराभवाचा धक्का?; तृणमूल म्हणते, अफवा पसरवू नका

 अभिनेता कमल हसन यांचा पराभव, भाजपच्या वनाथी श्रीनिवासन विजयी

(DMK Supporter Cuts off Part of Her Tongue to Fulfill Vow After DMK Victory )

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.