Tollygunge Election Result 2021 LIVE: टॉलीगंज विधानसभा जागेसाठी भाजप आणि टीएमसीत चुरशीची लढत

Tollygunge Assembly Election Result 2021 Live Update in Marathi : 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचे अरुप विश्वास (Aroop Biswas) तिसऱ्यांदा आमदार म्हणून येथून निवडून आले होते.

Tollygunge Election Result 2021 LIVE: टॉलीगंज विधानसभा जागेसाठी भाजप आणि टीएमसीत चुरशीची लढत
टॉलीगंज विधानसभा निवडणूक निकाल
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 6:33 AM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) पहिल्यांदाच आठ टप्प्यात घेण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया तृणमूल कांग्रेसने (AITMC) पुन्हा एकदा सत्तेत परत येण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने (BJP) देखील आपली पूर्ण ताकद लावली आहे. राज्यातील 294 विधानसभा जागांपैकी एक, टॉलीगंज (Tollygunge) विधानसभा जागा या निवडणुकीत ‘हाय प्रोफाईल’ जागा बनली आहे. येथून भारतीय जनता पक्षाने आपले खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना उमेदवारी दिली आहे (Tollygunge Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Assembly Seat).

ऑल इंडिया तृणमूल कांग्रेसने पुन्हा एकदा या जागेवरून आपले विद्यमान आमदार अरूप विश्वास (Aroop Biswas) यांना तिकीट दिले आहे. कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्‍सवादी (CPIM) पक्षाने येथून देवदत घोष (Debdut Ghosh) यांना उमेदवारी दिली आहे. यावेळेच्या निवडणुकीत या जागेसाठी एकूण 12 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विधानसभेच्या पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा असून, बहुमतांसाठी लागणारा आकडा 148 इतका आहे.

2016ची निवडणुक

टॉलीगंज विधानसभेची ही जागा पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात येते. या जागेवर मागील 20 वर्षांपासून टीएमसीचा उमेदवार निवडून येत आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचे अरुप विश्वास तिसऱ्यांदा आमदार म्हणून येथून निवडून आले होते. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) मधु सेन रॉय यांना 9896 मतांच्या फरकाने पराभूत केले होते (Tollygunge Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Assembly Seat).

एकूण मतदारांची संख्या

अरुप विश्वास यांना येथून 90603 मते मिळाली आणि मधू सेन यांच्या खात्यात 80707 मते पडली होती. भाजप येथे तिसऱ्या क्रमांकावर होते. भाजपाच्या उमेदवाराला जवळपास 15 हजार मते मिळाली होती. 2016च्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 257704 होती. यापैकी 194165 मतदारांनी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला होता. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी 308 बूथ तयार करण्यात आले होते, येथे 75.34 मतदान झाले होते.

1952 मध्ये टॉलीगंज विधानसभा जागेवर प्रथमच मतदान झाले होते, ज्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत सीपीएमनेही बर्‍याच काळासाठी येथे वर्चस्व राखले. टीएमसीने 2001मध्ये प्रथमच या जागेवर विजय मिळवला होता. तेव्हापासून हा पक्ष येथे सतत जिंकत आला आहे.

मागील निवडणुकीची आकडेवारी

विद्यमान आमदार : अरूप विश्वास

एकूण मते : 90603

एकूण मतदार : 257704

एकूण मतदान : 75.34 टक्के

एकूण उमेदवार : 8

(Tollygunge Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Assembly Seat)

हेही वाचा :

कोरोनाचा कहर सुरुच, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हांचं निधन, ममता बॅनर्जींकडून शोक व्यक्त

कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची पूर्णपणे माघार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.