कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची पूर्णपणे माघार

कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची पूर्णपणे माघार
सोनिया गांधी आणि राहुल गांधी

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील 43 जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. | west bengal election 2021

Rohit Dhamnaskar

|

Apr 22, 2021 | 8:21 AM

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) प्रचारातून आता काँग्रेसने पूर्णपणे माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपण आता पश्चिम बंगालमध्ये एकही सभा घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांतील मतदान बाकी असताना काँग्रेसने प्रचारातून पूर्णपणे माघार घेण्याचे ठरवले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. (Congress will not take part in campaigning of west bengal election 2021 remaing two phases)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनीवरुन यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार जवळपास थांबवल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील 43 जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. तर आणखी दोन टप्प्यांतील 69 जागांसाठी अद्याप मतदान व्हायचे बाकी आहे. मात्र, या दोन्ही टप्प्यात काँग्रेसकडून आता फारसा प्रचार होणार नसल्याचे दिसत आहे.

West Bengal Election 2021 : राहुल गांधी पाठोपाठ भाजपचाही मोठा निर्णय, फक्त 500 लोकांमध्ये होणार पंतप्रधान मोदींचा सभा!

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी सहाव्या टप्प्यातील 43 मतदारसंघांसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. काहीवेळापूर्वीच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. आज मतदान होत असलेल्या 43 मतदारसंघांमध्ये एकूण 306 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रमुख लढत ही भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्येच रंगणार आहे.

सहाव्या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, राहुल सिन्हा यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या ज्योतिप्रिय मलिक, चंद्रिमा भट्टाचार्य, राज चक्रवर्ती आणि कौसानी मुखर्जी या नेत्यांचे भवितव्य आज निश्चित होईल.

संबंधित बातम्या:

प्रियंका गांधींची चूक भाजप खासदाराने सुधारली!, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

West Bengal Election: ममता बॅनर्जी देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री, हॅट्रीक साधणार की विकेट पडणार?; नंदीग्रामचे मतदार देणार कौल

West Bengal Election: भाजपच्या ‘या’ नेत्याला महिला सुरक्षारक्षकांचं संरक्षण कवच; वाचा, कारण काय?

(Congress will not take part in campaigning of west bengal election 2021 remaing two phases)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें