West Bengal Election 2021 : राहुल गांधी पाठोपाठ भाजपचाही मोठा निर्णय, फक्त 500 लोकांमध्ये होणार पंतप्रधान मोदींचा सभा!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजपने हा मोठा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारसभांमध्ये फक्त 500 लोकांचीच उपस्थिती असणार आहे.

West Bengal Election 2021 : राहुल गांधी पाठोपाठ भाजपचाही मोठा निर्णय, फक्त 500 लोकांमध्ये होणार पंतप्रधान मोदींचा सभा!
West Bengal Election 2021 Pm Narendra modi kolkata
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 9:50 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही मोठा निर्णय घेतलाय. बंगालमध्ये भाजपच्या रॅलीत आता 500 पेक्षा अधिल लोक असणार नाहीत. त्याचबरोबर या सभा मोकळ्या मैदानात घेण्यात येईल, असंही भाजपकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजपने हा मोठा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारसभांमध्ये फक्त 500 लोकांचीच उपस्थिती असणार आहे. (BJP’s rally will be held in West Bengal in the presence of only 500 people)

भाजपने 6 कोटी मास्क आणि सॅनिटायझर वाटपाचं लक्ष्य ठेवल्याचंही भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलंय. कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. तसंच भाजपच्या सदस्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय राखला जावा, अशा सूचनाही नड्डा यांनी विविध राज्यातील भाजपच्या प्रमुखांना दिल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून स्वच्छता अभियान राबवले जावे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी, असंही नड्डा यांनी म्हटलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाजप सदस्यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आदेश नड्डा यांनी दिले आहेत.

भाजपचं ‘अपना बूथ कोरोना मुक्त’

कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी भाजपने एक मोहीम हाती घेतली आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष सदस्यांना ‘अपना बूथ कोरोना मुक्त’ अभियान राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांच्या पक्ष प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी विविध राज्यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना लोकांच्या मदतीसाठी सहाय्यता डेस्क आणि हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

राहुल गांधीच्या सर्व रॅली रद्द

यापूर्वी राहुल गांधी यांनीही पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व प्रचार रॅली रद्द केल्या आहेत. मोठ्या सभा घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार व्हावा असं आवाहनही राहुल गांधींनी केलं होतं. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा स्थगित करत आहे. मी सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की, सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सभा, रॅली आयोजित करण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करा’, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलंय.

ममता बॅनर्जींचाही मोठा निर्णय

राहुल गांधी यांनी आपल्या प्रचार रॅली रद्द केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहिलेल्या टप्प्यातील मतदानासाठी आपण निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनी ट्वीट करत त्याबाबत माहिती दिलीय. ‘बंगाल निवडणुकी दरम्यान कोरोना ज्या वेगानं वाढत आहे. ते पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता कोलकातामध्ये प्रचार करणार नाहीत. त्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रतिकात्मक पद्धतीनं एक बैठक घेतील. तर ज्या ठिकाणी आधीपासून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय, तिथे वेळ कमी करुन फक्त 30 मिनिटांत रॅली संपवली जाईल’, अशी माहिती डेरेक यांनी ट्वीटरद्वारे दिलीय.

संबंधित बातम्या :

India Corona Update : ‘अपना बूथ कोरोना मुक्त’, कोरोनाला रोखण्यासाठी भाजपाची खास मोहीम

Coronavirus: देशातील परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; दिल्लीत एका आठवड्याचा कर्फ्यू

BJP’s rally will be held in West Bengal in the presence of only 500 people

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.