India Corona Update : ‘अपना बूथ कोरोना मुक्त’, कोरोनाला रोखण्यासाठी भाजपाची खास मोहीम

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष सदस्यांना 'अपना बूथ कोरोना मुक्त' अभियान राबवण्याच्या सूचना केल्या आहेत.

India Corona Update : 'अपना बूथ कोरोना मुक्त', कोरोनाला रोखण्यासाठी भाजपाची खास मोहीम
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 2:32 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी भाजपने एक मोहीम हाती घेतली आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष सदस्यांना ‘अपना बूथ कोरोना मुक्त’ अभियान राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांच्या पक्ष प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी विविध राज्यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना लोकांच्या मदतीसाठी सहाय्यता डेस्क आणि हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. (BJP’s campaign Apna Booth corona mukth,  J. P. Nadda’s appeal to BJP members across the country)

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. तसंच भाजपच्या सदस्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करावं. प्लाझ्मा दान करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय राखला जावा, अशा सूचनाही नड्डा यांनी विविध राज्यातील भाजपच्या प्रमुखांना दिल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून स्वच्छता अभियान राबवले जावे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी, असंही नड्डा यांनी म्हटलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाजप सदस्यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आदेश नड्डा यांनी दिले आहेत.

दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. केजरीवाल यांनी दिल्ली सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या लाटेला तोंड देत आहे. राज्यात 25 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा सर्वाधिक धोका कुणाला? यादी जाहीर, तुमचं नाव तपासा!

VIDEO | लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी नेत्यांचा फोन, बुलडाण्याच्या ठाणेदाराची सटकली

BJP’s campaign Apna Booth corona mukth,  J. P. Nadda’s appeal to BJP members across the country

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.