UP Election: तिकीट न मिळाल्यामुळे, या पक्षाच्या उमेवाराने अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतले; प्रियंका गांधींच्या सहका-याने पैसे घेतल्याचा आरोप

| Updated on: Jan 16, 2022 | 1:23 PM

ज्यावेळी समाजवादी पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यांच्यानंतर अनेकांनी पक्षांतर केल्याची चर्चा आहे, तसेच काही नेते नाराज असल्याचे म्हणटले जात आहेत. दोन दिवसापुर्वी बसपाने एका नेत्याकडून लाखो रूपये घेऊन सुध्दा तिकीट दिली नसल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.

UP Election: तिकीट न मिळाल्यामुळे, या पक्षाच्या उमेवाराने अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतले; प्रियंका गांधींच्या सहका-याने पैसे घेतल्याचा आरोप
समाजवादी पार्टीचा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा फोटो
Follow us on

उत्तर प्रदेश – राजकारण (politics) एका वेगळ्या वळणावर कसं गेलंय हे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय. कारण निवडणुकीच्या (election) तारखा जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी इतक्या फास्ट घडतं आहेत की, अनेक गोष्टी नव्याने लोकांच्या समोर येत आहेत. संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या युपीच्या (up) निवडणुकीत रोज नव्या गोष्टीचा उगम होत आहे.

समाजवादी पार्टीच्या अलीगढचे नेते आदित्य ठाकूर यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्यांचं नाव जाहीर झालेल्या यादीत नसल्यामुळं ते नाराज होते. त्यावेळी तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना तिथून कसंबसं वाचवलं असं पोलिसांनी सांगितलं. आता ते सुरक्षित असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. अनेक ठिकाणी पैसे घेऊन पक्षाने तिकीट दिली नसल्याचे नेत्यांची तक्रार आहे.

ज्यावेळी समाजवादी पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यांच्यानंतर अनेकांनी पक्षांतर केल्याची चर्चा आहे, तसेच काही नेते नाराज असल्याचे म्हणटले जात आहेत. दोन दिवसापुर्वी बसपाने एका नेत्याकडून लाखो रूपये घेऊन सुध्दा तिकीट दिली नसल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.

प्रियंका गांधींचे पीएस संदीप सिंह यांच्यावर आरोप केले होते

शुक्रवारी काँग्रेसच्या एका महिला नेत्याने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोप करणाऱ्यांमध्ये काँग्रेसची पोस्टर गर्ल प्रियंका मौर्याचाही समावेश आहे. ज्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांचे स्वीय सचिव संदीप सिंह यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला आहे. राज्य महिला काँग्रेस मध्य विभागाच्या उपाध्यक्षा प्रियंका मौर्य यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांनी सरोजिनीनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकीटासाठी अर्ज केला आहे. या जागेसाठी 24 जणांनी अर्ज केले होते. मात्र पक्षाने रुद्र दमन सिंह नावाच्या व्यक्तीला तिकीट दिले असून त्यामागे संदीप सिंह यांचा हात आहे.

भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर