AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

Nawab Malik on Ravi Kishan : आता नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी अभिनेते रवी किशन यांचा एक फोटो शेअर करत त्यांची खिल्ली उडवली आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ओबीसी मतदारांसोबत जेवणं केलं होतं.

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली
रवी किशन यांचा नवाब मलिकांनी शेअर केलेला फोटो
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 8:35 PM
Share

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं (UP Assembly Election 2022) बिगुल वाजलंय. राष्ट्रवादीनंही आपली रणनिती स्पष्ट केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच इच्छुक उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वक्तव्यांनाही उधाण आलेलं आहे. उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी मतं महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे या वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होताना पाहायला मिळतो आहेत. दरम्यान, आता नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी अभिनेते रवी किशन यांचा एक फोटो शेअर करत त्यांची खिल्ली उडवली आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ओबीसी मतदारांसोबत जेवणं केलं होतं. त्यानंतर आता रवी किशनही (Ravi Kishan) त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं दिसून आलंय. दरम्यान, याबाबतचा फोटो शेअर नवाब मलिक यांनी रवी किशन यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

पाहा रवी किशन यांचं ट्वीट

सबका साथ सबका विकास असं म्हणत रवी किशन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर होते. तर दुसरीकडे रवी किशन यांचा एक फोटो नवाब मलिक यांनीही शेअर केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की,…

पत्तल, सलाद, पूरी और भाजी दर्शाता है की माल रसोईये का है। दलित लोटे में पानी पिये और अभिनेता कगाज की गिलास में। वाह बचवा वाह.. ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा

नवाल मलिक यांचं ट्वीट

नवाब मलिक यांनी रवी किशन यांच्यासोबत जेवायला बसलेल्या माणूस हा पाण्याचा लोटा घेऊन बसला आहे. तर दुसरीकडे रवी किशन यांनी कागदी ग्लास घेतल्याचं फोटोमध्ये दिसून आलं आहे. यावरुन निशाणा साधताना नवाब मलिक यांनी रवी किशन यांना उद्देशून ‘ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा’ असं म्हटलंय. इतकंच काय तर योगी आदित्यनाथ यांचाही एक फोटो नवाब मलिक यांनी शेअर केला असून या फोटोमध्ये पत्रावळ्या आणि कुल्लडमधून सिद्ध झालं आहे भाजप नेते दलितांच्या घरी जाऊन जेवणाचा निव्वळ दिखावा करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. तसंच जेवणाचाही बंदोबस्त भाजपनंच केला होता, अशीही शंका नवाब मलिकांनी व्यक्त केली आहे.

योगींवरुनही निशाणा –

संबंधित बातम्या :

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर

UP Election 2022: भीम आर्मी-समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिस्कटलं, चंद्रशेखर आजाद यांचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसकडून ‘बिकिनी गर्ल’ मैदानात, कोण आहे अर्चना गौतम?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.