AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसकडून ‘बिकिनी गर्ल’ मैदानात, कोण आहे अर्चना गौतम?

काँग्रेसकडून (congress) नुकतीच 125 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात उन्नावमध्ये बलात्कार झालेल्या पीडितेच्या आईला तिकीट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर 'बिकनी गर्ल' अर्चना गौतमला उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसकडून 'बिकिनी गर्ल' मैदानात, कोण आहे अर्चना गौतम?
अर्चना गौतम
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 1:58 PM
Share

uttar pradesh assembly election 2022: उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं (up assembly election) वारं वाहतंय. या निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के महिलांना मैदानात उतरवणार आहे. तशी घोषणा काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांनी याआधी केली आहे. काँग्रेसकडून (congress) नुकतीच 125 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात उन्नावमध्ये बलात्कार झालेल्या पीडितेच्या आईला तिकीट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर ‘बिकनी गर्ल’ अर्चना गौतमला(archana gautam) उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने काल विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अभिनेत्री अर्चना गौतमला मेरठमधल्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ती बी- टाऊनमध्ये ‘बिकनी गर्ल’ नावाने प्रसिद्ध आहे.

अर्चना गौतम कोण आहे? अर्चना गौतमने IIIMT तून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. पण पत्रकारितेत तिचं मन रमलं नाही. त्यामुळे तिने मॉडेलिंगला सुरूवात केली. 2014 ला मिस उत्तर प्रदेशचा किताब जिंकला. त्यानंतर 2018 मध्ये ती ‘मिस बिकनी इंडिया’ ठरली. ‘मिस बिकनी युनिव्हर्स’चा ताज तिने जिंकला. त्यानंतर ती ‘बिकनी गर्ल’ या नावाने ओळखली जाऊ लागली. याचसोबत मिस कुओमो इंडिया, मिस टॅलेट हे किताब आपल्या नावे केलेत. ती काही जाहिरातींमधून छोट्या पडद्यावर झळकली. त्याचसोबत काही दाक्षिणात्य सिनेमातही तिने काम केलं आहे.

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर

१० फेब्रुवारीला उत्तर प्रदेश विधानसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश पिंजून काढत आहेत. महिलांशी संबंधित प्रश्नांवर त्या आवाज उठवत आहेत. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ हा नारा देत त्या महिलांना राजकारणात सक्रिय होण्यास प्रोत्साहन देत आहेत. अशातच काल जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवार यादीत महिलांना 40 टक्के स्थान देण्यात आलं आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसने तिकीट दिलंय. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद, सोनभद्रच्या पीडित आदिवासी व्यक्तीला काँग्रेसने तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

संबंधित बातम्या

Chitragupta Death anniversary : जेव्हा लतादीदी संगीतकार चित्रगुप्त यांना म्हणाल्या, ‘चपलेवर भरोसा आहे, माझ्या आवाजावर नाही?’, वाचा संगीतमय किस्सा

Kiran Mane | कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच; अभिनेता किरण माने भूमिकेवर ठाम

Kiran Mane | मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा, दिला महाराष्ट्राच्या वारशाचा दाखला, म्हणाले…

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.