योगी आदित्यनाथ कुठून लढणार? अयोध्या की गोरखपूर? भाजपा फायनल निर्णय घेण्याच्या तयारीत

खुद्द योगी आदित्यनाथ यांचे गुरु महंत अवैद्यनाथ आणि त्यांचे गुरु महंत दिग्विजयनाथ यांचा अयोध्या आणि राम मंदिर उभारणी चळवळीशी थेट संबंध राहिला आहे. त्यामुळे गोरखपूरपीठाशी जरी योगी आदित्यनाथ यांचा संबंध असला तरीसुद्धा ते यावेळेस अयोध्येतून निवडणूक लढण्याची शक्यताच अधिक आहेत.

योगी आदित्यनाथ कुठून लढणार? अयोध्या की गोरखपूर? भाजपा फायनल निर्णय घेण्याच्या तयारीत
योगींनी कुठून लढायचं याचा निर्णय भाजपा हायकमांड घेणार
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 8:00 AM

उत्तर प्रदेशची विधानसभा (Uttar Pradesh Assembly Election 2022) निवडणूक ऐन भरात येताना दिसतेय. कारण एकीकडे उमेदवारी कुणाला द्यायची यावर बैठकांवर बैठका झडतायत तर दुसरीकडे आयाराम गयारामांचे दिवसही सुरु झालेत. त्यातच भाजपच्या दोन टॉपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानं जोरदार धक्का बसलाय.  त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) विधानसभा निवडणूक लढवणार की तेही उत्तर प्रदेशाच्या इतर मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांसारखे विधान परिषदेतूनच येणार याचीही चर्चा रंगली. पण हाती येत असलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ हे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचं खात्रीलायकपणे समजतं. पण ते कुठून लढणार याबाबत मात्र अजूनही खल सुरु आहे. योगींसमोर अयोध्या (Ayodhya) आणि गोरखपूर असे दोन पर्याय आहेत.

अयोध्या की गोरखपूर?

योगी आदित्यनाथ विधानसभेच्या आखाड्यात प्रत्यक्ष उतरणार याबाबत साशंकता आता राहिलेली नाही. त्यावर दिल्लीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मोठी चर्चा झालीय. टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं तशी बातमी दिली आहे. आणि बहुतांश नेत्यांचं एकमत झालंय की, योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून विधानसभा लढवावी. पण खुद्द योगी आदित्यनाथ आणि त्यांचं राजकीय जीवन हे गोरखपूरमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या टॉपच्या लीडरशिपनं जरी योगींसाठी अयोध्येची निवड केली असली तरीसुद्धा गोरखपूर हाही एक पर्याय आहे. अंतिम निर्णय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहाच घेतील. खुद्द योगींना निवडीचं स्वातंत्र्य दिलं गेलं तर तेही गोरखपूरऐवजी अयोध्येची निवड करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

का अयोध्या?

गेल्या दोन एक वर्षातल्या घडामोडींवर लक्ष घातलं तर गोरखपूरऐवजी अयोध्या का ह्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल. अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचा कॅडर बेस आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं अयोध्येचा राम मंदिराचा वाद संपुष्टात आलाय आणि राम मंदिराची मोठ्या जोमात उभारणी सुरु आहे. खुद्द योगी आदित्यनाथ यांचे गुरु महंत अवैद्यनाथ आणि त्यांचे गुरु महंत दिग्विजयनाथ यांचा अयोध्या आणि राम मंदिर उभारणी चळवळीशी थेट संबंध राहिला आहे. त्यामुळे गोरखपूरपीठाशी जरी योगी आदित्यनाथ यांचा संबंध असला तरीसुद्धा ते यावेळेस अयोध्येतून निवडणूक लढण्याची शक्यताच अधिक आहेत.

17 वर्षातले पहिले सीएम

बसपा नेत्या मायावती यांनी विधानसभा न लढवण्याची घोषणा केलीय. अखिलेश यादव यांनाही याबाबतचा निर्णय पक्षावर सोडलाय. पण योगी आदित्यनाथ आता निवडणूक लवढण्याच्या तयारीत आहेत आणि तसं झालं तर विधानसभा लढवणारे ते 17 वर्षातले पहिले मुख्यमंत्री ठरतील. कारण यूपीत मुलायमसिंग यांच्यानंतर जेही मुख्यमंत्री झाले त्यांनी प्रत्यक्ष विधानसभा न लढवता विधान परिषदेतूनच येणे पसंत केले. मग त्यात 2007 ते 12 दरम्यान मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती असोत की त्यानंतर 2012 ते 2017 दरम्यान मुख्यमंत्री राहीलेले अखिलेश यादव असतील. दोघांनीही विधानसभा न लढता विधान परिषदेचा मार्ग पत्करला.

हे सुद्धा वाचा:

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना मोठा धक्का! स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम, समाजवादी पार्टीत प्रवेश!

Yogi Aadityanath: जेव्हा योगी आदित्यनाथ मंचावर एका भाजप नेत्यावर भडकतात, बघा Video

योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडून जाईल; प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचा इशारा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.