केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह पत्नीलाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मात्र, टीएमसीवर निशाणा सुरुच

Yuvraj Jadhav

|

Updated on: Apr 25, 2021 | 3:04 PM

आसनसोलचे भाजप खासदार केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि त्यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाला आहे. Babul Supriyo Corona infected

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह पत्नीलाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मात्र, टीएमसीवर निशाणा सुरुच
बाबुल सुप्रियो, केंद्रीय राज्यमंत्री
Follow us

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (West Bengal Election 2021)आतापर्यंत सहा टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होत असून यामध्ये 36 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल. यामध्ये दक्षिण दिनाजपूर, मालदा (6), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (4), पश्चिम बर्दवान (9) विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 36 जागासांठी 268 उमेदवार मैदानात आहेत. आसनसोलचे भाजप खासदार केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि त्यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाला आहे. बाबुल सुप्रियो यांनी ट्विटकरुन ही माहिती दिली आहे. ( West Bengal Election 2021 BJP Leader Union Minister Babul Supriyo and wife Corona infected before voting in Asansol tomorrow )

बाबुल सुप्रियो काय म्हणाले?

केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी ट्विट करुन कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली. ” मी आणि माझी पत्नी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आलो आहोत. आसनसोलमध्ये मतदान करु शकणार नाही, दुखद गोष्ट आहे. मला 26 व्या मतदानासाठी तिथे जाण्याची गरज होती. जिथे तृणमूल काँग्रेसच्या हताश गुंडांनी पहिल्यापासूनच स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदान प्रक्रिया बाधित करण्याचा प्रयत्न केलाय”, असं ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केलं आहे.

बाबुल सुप्रियो यांचं ट्विट

बाबुल सुप्रियो यांचा टीएमसीवर निशाणा

कोरोना झाल्याची माहिती दिल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी टीएमसीवर निशाणा साधला. टीएमसीच्या आतंकवादी यंत्रणेने खूश होण्याची गरज नाही. मी ज्याप्रमाणं 2014 पासून तुम्हाला हाताळतोय त्याप्रमाणेच हाताळणार आहे. मी माझ्या खोलीतून माझे काम करेन, आसनसोलमधील भाजपच्या 9 उमेदवारांना मानसिक समर्थन देणार, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले.

दरम्यान, खडदह विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा (Kajal Sinha) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 22 एप्रिलला कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं त्यांन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर सुरुच, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हांचं निधन, ममता बॅनर्जींकडून शोक व्यक्त

West Bengal Election: भाजपच्या ‘या’ नेत्याला महिला सुरक्षारक्षकांचं संरक्षण कवच; वाचा, कारण काय?

( Union Minister Babul Supriyo and wife Corona infected before voting in Asansol tomorrow )

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI