AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झुकलेले खांदे, हातात काठी, 3 Idiots फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून फॅन्स इमोशनल

3 Idiots सिनेमातील काही सीन आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील दुःख होईल. सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्याला आता हातात काठी घेऊन चालावं लागत आहे.

झुकलेले खांदे, हातात काठी, 3 Idiots फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून फॅन्स इमोशनल
3 idiots
| Updated on: Aug 22, 2026 | 11:06 AM
Share

3 Idiots फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून फॅन्स इमोशनल झाले आहे. एक काळ असा होता, जेव्हा सिनेमाने सर्वांचं भरभरुन मनोरंजन केलं. पण आता सिनेमातील एका अभित्याला हातात काठी घेवून चालावं लागत आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेते परीक्षित सहानी आहेत. सहानी यांनी सिनेमात फरहान याचे स्ट्रिक्ट वडील, म्हणजेच ‘सुरज कुरेशी’ यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये साहनी काठीचा आधार घेऊन चालताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत ‘अब्बा बूढ़े हो गए…’, असं लिहिलं आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

एका व्हायरल व्हिडिओमध्ये, परीक्षित साहनी एका सार्वजनिक ठिकाणी अडखळत चालताना दिसले; यावेळी त्यांना पुढे जाण्यास मदत करण्यासाठी एक कर्मचारी त्यांच्या खांद्याला आधार देत होता. सहनी यांनी पायजमा आणि टी-शर्ट घातला होता, तसेच त्यांनी लाल रंगाची टोपी आणि हातात चालण्याची काठी घेतली होती. त्यांच्यावर वाढत्या वयाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत होता, तरीही ते हसतानाही दिसले.

चाहते भावून…

सहानी यांचा व्हिडीओ समोर येताच चाहते देखील भावूक झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘3 इडियट्स’ सिनेमातील त्यांची भूमिका आठवत अनेकांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘लेजेंट’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘यालाच आयुष्य म्हणतात.’, तिसरा नेटकरी विनोदी कमेंट करत म्हणाला, ‘असं वाटतं फरहान अद्याप सेट नाही झाला.’

परीक्षित साहनी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते बलराज साहनी यांचे पूत्र आहे. त्यांनी वडिलांप्रमाणेच अभिनय विश्वात स्वतःचं नाव मोठं केलं. ‘3 इडियट्स’ सिनेमा शिवाय त्यांनी ‘पीके’, ‘सुल्तान’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ते 82 वर्षांचे असून लाईमलाईटपासून दूर आहेत.

Follow Us
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?