AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसतं संगीत ऐकलं तरी लोक ठेका धरतात, 30 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही प्रचंड सुपरहिट

ममता कुलकर्णी यांचं 30 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याचे संगीत ऐकून लोक पार्टीमध्ये लगेच ठेका धरतात. आजही हे गाणं ऐकून आलं तरी लोक हे गाणं दिवसभर गुणगुणतात.

नुसतं संगीत ऐकलं तरी लोक ठेका धरतात, 30 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 10, 2026 | 1:44 PM
Share

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आली, जी लग्नसमारंभ असो किंवा पार्टी, वाजताच वातावरणात उत्साह निर्माण व्हायचा. याच काळातील एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘कोई जाए तो ले आए’. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घातक’ या चित्रपटातील हे गाणं आज जवळपास तीन दशकांनंतरही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळतं.

ममता कुलकर्णींवर चित्रित झालेलं हे गाणं त्याकाळी आपल्या भन्नाट बीट्स, ग्लॅमर आणि कॅची संगीतामुळे प्रचंड लोकप्रिय झालं होतं. गाणं सुरू होताच डान्स फ्लोअरवर उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं. 90 च्या दशकातील पार्टी कल्चर आणि त्या काळातील खास संगीताची झलक या गाण्यात पाहायला मिळते.

गाण्यापेक्षा संगीत जास्त चर्चेत

‘घातक’ चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. चित्रपटात सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, डॅनी डेन्झोंगपा आणि अमरीश पुरी यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. ममता कुलकर्णीही या चित्रपटाचा भाग होत्या आणि ‘कोई जाए तो ले आए’ या गाण्यात त्यांचा ग्लॅमरस अंदाज विशेष चर्चेत आला होता.

या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आणि शायर राहत इंदौरी यांनी लिहिले होते, तर संगीत अनु मलिक यांनी दिलं होतं. अलका याग्निक आणि शंकर महादेवन यांच्या आवाजाने गाण्याला वेगळीच रंगत आणली. गाण्याची आकर्षक धून आणि वारंवार येणारी कॅची ओळ यामुळे ते श्रोत्यांच्या लक्षात कायम राहिलं.

30 वर्षानंतरही गाण्याची क्रेझ कायम

‘घातक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. चित्रपटाच्या यशासोबतच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. त्यापैकी ‘कोई जाए तो ले आए’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं

आजच्या काळातही 90 च्या दशकातील जुन्या गाण्यांची क्रेझ कायम आहे. लग्नसमारंभ, पार्टी किंवा जुन्या हिंदी गाण्यांची मैफल असो, ‘कोई जाए तो ले आए’ वाजलं की 90 च्या दशकातील आठवणी आणि त्याकाळची धमाल पुन्हा अनुभवायला मिळते. त्यामुळे जवळपास 30 वर्षांनंतरही हे गाणं जुनं झालं असलं तरी त्याची मजा आणि लोकप्रियता मात्र कमी झालेली नाही.

Follow Us
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?