AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

32 वर्षांपूर्वी नाना पाटेकरांना होता हा आजार, तरीही अभिनेत्रीसोबत केला जबरदस्त डान्स, गाणं आजही चर्चेत

हृदयाशी संबंधित समस्या असूनही नाना पाटेकर यांनी 32 वर्षांपूर्वी या अभिनेत्रीसोबत केला होता जबरदस्त डान्स. गाण्याची आजही होते प्रचंड चर्चा.

32 वर्षांपूर्वी नाना पाटेकरांना होता हा आजार, तरीही अभिनेत्रीसोबत केला जबरदस्त डान्स, गाणं आजही चर्चेत
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 08, 2026 | 1:49 PM
Share

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या घरी गुरुवारी सकाळी त्यांना कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचे प्रयत्न केले, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नाना पाटेकर यांनी जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या. गंभीर भूमिकांसोबतच त्यांनी विनोदी भूमिकांमध्येही स्वतःची वेगळी छाप पाडली. मात्र, फार कमी चित्रपटांमध्ये ते गाण्यांवर नृत्य करताना दिसले. यापैकी 1994 मध्ये प्रदर्शित झालेला ‘क्रांतिवीर’ हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला.

‘क्रांतिवीर’च्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांना झाली होती हृदयाची समस्या

नाना पाटेकर, डिंपल कपाडिया, अतुल अग्निहोत्री आणि ममता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘क्रांतिवीर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांना हृदयाशी संबंधित त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दिग्दर्शक मेहुल कुमार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांनी, ‘जर मी मरण पावलो तर तुमचा चित्रपट आणि त्याचा क्लायमॅक्स पूर्ण होईल,’ अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर नाना पाटेकर यांनी पुन्हा चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग पूर्ण केले.

बिंदूसोबतही केला होता दमदार डान्स

‘क्रांतिवीर’मधील ‘लव रॅप’ या गाण्यात नाना पाटेकर ममता कुलकर्णी आणि अतुल अग्निहोत्री यांच्यासोबत नृत्य करताना दिसले होते. याच गाण्यात त्यांनी अभिनेत्री बिंदूसोबतही जोरदार डान्स केला होता. या गाण्याला अमित कुमार, सपना मुखर्जी आणि सुषमा श्रेष्ठा यांनी आवाज दिला असून गीतकार समीर यांनी हे गाणं लिहिले आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, त्यांच्या दमदार अभिनयाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

Follow Us
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर