AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जूही चावलाचं प्रचंड सुपरहिट गाणं, गाण्यामुळे चित्रपट ठरलेला ब्लॉकबस्टर, 33 वर्षांपासून हिट

जूही चावला-आमिर खानच्या या गाण्यामुळे 33 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट ठरला होता प्रचंड ब्लॉकबस्टर. गाण्यामधील अभिनेत्रीच्या लुकची रंगलेली प्रचंड चर्चा.

जूही चावलाचं प्रचंड सुपरहिट गाणं, गाण्यामुळे चित्रपट ठरलेला ब्लॉकबस्टर, 33 वर्षांपासून हिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 22, 2026 | 3:40 PM
Share

अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जूही चावला यांची जोडी असलेला ‘हम हैं राही प्यार के’ हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती ताहिर हुसैन यांनी केली होती. आमिर खान आणि रॉबिन भट्ट यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होती, तर नदीम-श्रवण यांनी संगीत दिले होते. हा चित्रपट 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाउस बोट’ या हॉलिवूड चित्रपटावर आधारित असल्याचे सांगितले जाते.

या चित्रपटातील ‘घुंघट की आड़ से दिलबर का…’ हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या स्मरणात आहे. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजातील हे रोमँटिक गाणं जूही चावला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. 90च्या दशकात हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यावेळी गाण्याच्या तब्बल 25 लाख युनिट्सची विक्री झाल्याचे बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

गाण्यासोबत जूही चावलाच्या लुकची जोरदार चर्चा

या गाण्याचे बोल गीतकार समीर यांनी लिहिले असून, नदीम-श्रवण यांनी संगीत दिले होते. पारंपरिक भारतीय संस्कृती, प्रेम आणि श्रृंगार रस यांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. प्रियकराला घुंघटाआडून पाहण्याची उत्सुकता आणि प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त करण्यात आली आहे. सुरुवातीला ‘आड़’ या शब्दाच्या वापराबाबत काही संभ्रम होता, मात्र पुढे याच शब्दाभोवती गुंफलेले गाणे लोकप्रिय ठरले.

गाण्याच्या लोकप्रियतेसोबतच जूही चावलाच्या लूकचीही विशेष चर्चा झाली होती. डिझायनर नीता लुल्ला यांनी या गाण्यासाठी जूहीच्या पोशाखात मोठ्या प्रमाणात विंटेज मिरर वर्कचा वापर केला होता. जयपूरमधील शूटिंगच्या काही काळ आधी हा पोशाख तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. या पारंपरिक आणि ग्लॅमरस लूकने त्याकाळी फॅशनमध्येही वेगळी छाप पाडली होती.

चित्रपटाची कथा काय?

‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटाला त्या वर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. महेश भट्ट यांना विशेष ज्युरी पुरस्कार, तर अलका याग्निक यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाची कथा राहुलभोवती फिरते. आपल्या तीन लहान भाच्यांची, सनी, विक्की आणि मुन्नीची जबाबदारी सांभाळणाऱ्या राहुलच्या आयुष्यात वैजयंतीची एन्ट्री होते. एका मेळ्यात त्यांची भेट होते आणि घरातून पळून आलेली वैजयंती त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती बनते.

आजही ‘घुंघट की आड़ से’ हे गाणे रेडिओ, लग्नसमारंभ आणि संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. 90च्या दशकातील रोमँटिक गाण्यांमध्ये या गाण्याचे स्थान आजही खास मानले जाते.

Follow Us
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?