AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

58 वर्षांपूर्वीचं गाणं, जे गाऊन बस आणि रेल्वेत मागितली जायची भीक, आजही लोकांच्या ओठांवर

58 वर्षांपूर्वीचं धर्मेंद्र-माला-महमूद यांचं गाणं, ज्याला गाऊन बस आणि रेल्वेमध्ये मागितली जायची भीक.आजही हेच गाणं अनेक ठिकाणी ऐकू येत. तुम्हाला माहिती का?

58 वर्षांपूर्वीचं गाणं, जे गाऊन बस आणि रेल्वेत मागितली जायची भीक, आजही लोकांच्या ओठांवर
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 08, 2026 | 7:17 PM
Share

बॉलिवूडमध्ये हेरगिरीवर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. अशा चित्रपटांमध्ये मिशन पूर्ण करण्यासाठी नायक-नायिकांना अनेकदा वेगवेगळे वेश धारण करावे लागतात. समोरच्या व्यक्तीला आपली खरी ओळख कळू नये यासाठी भिकारी, साधू किंवा अन्य व्यक्तींचा वेश घेतला जातो. असाच काहीसा प्रकार 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आँखें’ या चित्रपटात पाहायला मिळाला होता.

रामानंद सागर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र, माला सिन्हा, मेहमूद, कुमकुम, जीवन, मदन पुरी आणि नजीर हुसैन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. त्यामुळे मिशनदरम्यान अनेक पात्रांना आपली ओळख लपवण्यासाठी वेगवेगळे वेश धारण करावे लागतात.

भिकाऱ्याच्या वेशात गायलेलं गाणं आजही लोकप्रिय

या चित्रपटातील ‘तुझको रखे राम, तुझको अल्लाह रखे’ हे गाणं आजही तितकेच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील एका मिशनदरम्यान पात्रांना भिकाऱ्यांचा वेश धारण करावा लागतो आणि याच वेशात ते रस्त्यावर फिरत गाणे गाताना दिसतात.

रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेकदा ऐकू येणाऱ्या या गाण्याने भिकाऱ्यांच्या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. गाण्याची चाल, शब्द आणि पडद्यावरचे सादरीकरण यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

मन्ना डे आणि आशा भोसले यांच्या आवाजाची जादू

या अजरामर गाण्याला मन्ना डे आणि आशा भोसले यांनी आवाज दिला होता. प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले होते तर रवि यांनी त्याला संगीत दिले होते.

या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये ‘राम’ आणि ‘अल्लाह’ यांना एकाच भावनेत जोडण्यात आले आहे. त्यामुळे हे केवळ भिकाऱ्यांच्या वेशात गायलेले चित्रपटातील गाणे न राहता मानवता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारे गाणं ठरते.

माला सिन्हा आणि मेहमूद यांच्यासह कलाकार रस्त्यावर फिरत हे गाणं सादर करताना दिसतात. त्यामुळे गाण्याची धून ऐकताच आजही त्या काळातील चित्रपटातील मजेशीर प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...